शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

बारा लाख घेऊन कारचालक फरार!

By admin | Published: March 30, 2016 1:00 AM

मुंबई येथील लोखंड व्यापाऱ्याची वसुली केलेली १२ लाखांची रोकड घेऊन कारचालक पळून गेला. साताऱ्यात संगमनगर येथील पेट्रोल पंपासमोर एका व्यापारी संकुलासमोर कार सोडून

कोरेगाव (सातारा) : मुंबई येथील लोखंड व्यापाऱ्याची वसुली केलेली १२ लाखांची रोकड घेऊन कारचालक पळून गेला. साताऱ्यात संगमनगर येथील पेट्रोल पंपासमोर एका व्यापारी संकुलासमोर कार सोडून त्याने पलायन केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे नरेशकुमार रतनलाल ओझा यांची अनंत एंटरप्रायझेस नावाची फर्म आहे. ते राज्यातील व्यापाऱ्यांना लोखंड पुरवतात. याच फर्ममध्ये जयंतीलाल गिरिधारीलाल त्रिवेदी हे वसुलीचे काम पाहतात. त्यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या वसुलीचे काम सोपविण्यात आले आहे. अनंत एंटरप्रायझेसमध्ये तेज बहादूर गिरी हा चालक म्हणून काम करत होता. तो जोगेश्वरी पूर्व येथे वास्तव्यास आहे. ओझा यांच्या सूचनेप्रमाणे त्रिवेदी व गिरी हे दोघे सोमवारी सकाळी कार मधून सातारा जिल्ह्यातील वसुलीसाठी बाहेर पडले. सायंकाळी सहाच्या सुमारास ते दोघे कोरेगाव येथे पोहोचले. येथील मोहन स्टील सेंटरमधून दोन लाखांची रोकड जमा करून घेत त्रिवेदी यांनी सर्व रक्कम ११ लाख ७९ हजार ६०० रुपये कारच्या बॅगेमध्ये ठेवली. चालक गिरी हा गाडीतच बसून होता. त्रिवेदी हे मोहन स्टील सेंटरमध्ये व्यावसायिक बोलणी करत होते. कोरेगावातून कऱ्हाड येथे जायचे असल्याने त्यांनी चालक गिरी याच्या मोबाईलवर संपर्क साधून, ‘आपल्याला निघायचे आहे, तू कोठे आहेस,’ अशी विचारणा केली. त्यावर त्याने नैसर्गिक विधीसाठी आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद केल्याचे लक्षात आले. तेज बहादूर गिरी हा गाडीसह रोकड घेऊन पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुंबईत ओझा यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तेज बहादूरचे कुटुंबही गायबचालक तेज बहादूर गिरी हा कोरेगावातून रोकड घेऊन पसार झाल्याचे समजल्यानंतर मुंबईतील व्यापारी नरेशकुमार ओझा यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना गिरी याच्या जोगेश्वरीतील घरी पाठविले. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याचे कुटुंबीय घर सोडून गायब झाल्याचे समजले.