शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

बराखीतला कांदा गेला सडून

By admin | Published: February 27, 2017 1:00 AM

कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे.

मंचर : कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा बराखीत तसाच सोडून दिला आहे. कांदा बराखीत सडून गेला असून, कांद्याला कोंब आले आहेत. सडलेल्या कांद्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोठ्या कष्टाने आणि भांडवल गुंतवून घेतलेले कांदा पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.कांदा पिकाला यावर्षी अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतो. सुरुवातीपासून कांद्याला बाजारभाव नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा बराखी बनवून ठेवल्या आहेत. या बराखीसाठी त्यांना बराच खर्च यापूर्वीच करावा लागला आहे. बराखीत कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागला. कांद्याचा बाजारभाव वाढल्यावर शेतकरी बराखीतील कांदा विक्रीसाठी बाहेर काढणार होता. वर्षभर कांद्याचे बाजारभाव वाढलेच नाहीत. आधीच कांदा पिकाला मोठा खर्च करावा लागला होता. आता मिळणाऱ्या बाजारभावाने भांडवलही वसूल होणार नव्हते. त्यामुळे बराखीतील कांदा बाहेर काढून तो बाजारात विक्रीसाठी नेण्यास शेतकरी उत्सुक नव्हता. बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांनी बराखीतच सोडून दिला आहे. बराखीतील कांद्याला सुरुवातीला कोंब आले. हळूहळू तो सडू लागला आहे. कांद्याच्या बराखीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहात आहे. सडलेल्या कांद्याची दुर्गंधी पसरू लागली आहे. (वार्ताहर) >सध्या नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आला आहे. कांद्याला १० किलोला ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळतोय. गुलटी २५ ते ४०, तर बदला कांदा १५ ते २५ रुपये १० किलो या भावाने विकला जातोय. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शिवाय यावर्षीचे वातावरण कांदा पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे भविष्यात कांदा पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी आहे.