बारामती : नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना तातडीने २४ तासांत मदत देण्यासाठी ‘एकत्रित निधी’ संकलन योजना अमलात आणावी, असा विचार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कुटुंब विमा योजना लागू करण्यात येणार आहे. कृषी विकासासाठी ‘बारामती पॅटर्न’ राज्यात सर्वत्र लागू केला जाईल, असे सूतोवाच महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.बारामती दौऱ्यावर आलेले खडसे म्हणाले, पीकपद्धती बदलण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. कालबाह्य योजना बंद करून नवीन योजनांसाठी प्रयत्नशील राहणार आहे. शेतकऱ्यांच्या ‘एकत्रित निधी’ योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. सामूहिक विमा योजनांबाबत विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासन तातडीची मदत म्हणून १ लाख रुपये देते. विमा योजनेमुळे त्यांना अधिक रकमेचे संरक्षण मिळेल. (प्रतिनिधी)
कृषी विकासाचा ‘बारामती पॅटर्न’ राज्यभर -खडसे
By admin | Published: February 16, 2015 3:22 AM