शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बारामतीतील टँकर कमी होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 1:25 AM

२२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे

बारामती : तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांतील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांतील ७४ हजार २४ एवढ्या लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यांतील १ लाख ४४ हजार ४४६ लोकांना शासनाच्या वतीने ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.बारामती उपविभागात या वर्षी पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपविभागातील बारामती तालुक्यात ३४, तर इंदापूर तालुक्यात २३ अशा एकूण ५७ टँकरनी दोन्ही तालुक्यांतील मिळून एकूण १ लाख ४४ हजार ४४६ लोकसंख्येला शासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना, तर इंदापूर तालुक्यातील २५ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सलग तीन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मागील आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने फळबागांचे नुकसान झाले. मात्र, सध्या ओढा, नाले खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. ज्या भागात पाऊस पडला, तेथे पाणी साठून राहण्यास मदत झाली. मात्र, टँकरची संख्या अद्याप कमी झालेली नाही. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या गावातील एकूण लोकसंख्या ७० हजार ४२२ इतकी आहे.इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी - २, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहळी, घोरपडवाडी, कचरवाडी, निमगाव केतकी, कडबनवाडी, अकोले, निरनिमगाव, काटी, लामजेवाडी, भादलवाडी, पिटकेश्वर या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ९७ वाड्या-वस्त्यांना २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ७४ हजार ०२४ इतकी आहे. या भागातील खासगी ९, तर २ शासकीय बोअर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.