शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

बारामतीत थंडी तापाचे रुग्ण वाढले

By admin | Published: July 14, 2017 1:39 AM

बारामती शहरात नागरिकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती शहरात नागरिकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. बारामती शहरात अद्यापपर्यंत एकही डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ किरकोळ थंडीतापाचे रुग्ण आहेत.याबाबत बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती शहरात नागरीकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. बारामती शहरात अद्यापपर्यंत एकही डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ किरकोळ थंडीतापाचे रुग्ण आहेत. मात्र, या काळात डेंग्यूसदृश आजार, चिकुन गुनिय आजाराचे रुग्ण आढळतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.या वेळी नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक ठिकाणी पाणी साठू देऊ नये. साठलेल्या पाण्याची डबकी नष्ट करा. पाणी वाहते करावे. पाणी भरलेली भांडी झाकुन ठेवावी. आठवड्यातुन किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठा रिकामा करावा. नारळाच्या करवंट्या, टायर मध्ये पावसाचे पाणी साठते. यामध्ये डेंग्यूसदृश आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे घराच्या सभोवताली टायर, नारळाच्या करवंट्या साठू देऊ नये. स्वच्छतागृहाच्या वर काढलेल्या पाईपला नायलॉनची जाळी घालावी, असे आवाहन डॉ चिंचोलीकर यांनी केले आहे.दरम्यान,रुग्णालयाकडे सध्या सर्वेक्षणासाठी केवळ ४ कर्मचारी उपलब्ध आहेत. या उपलब्ध कर्मचाऱ्यांद्वारेच शहरात आरोग्य सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, आणखी कर्मचारी भरतीबाबत वर्तमानपत्रामध्ये जहिरात प्रसिध्दी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ८ ते १५ दिवसांत आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील. त्यानंतर शहरातील सुमारे १ लाख २१ हजार लोकसंख्येचे आरोग्य नियोजन करणे शक्य होईल, असे डॉ. चिंचोलीकर म्हणाल्या.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी सांगितले की, तालुक्यात केवळ मोरगांवमध्ये डेंग्यूसदृश ताप, चिकुन गुनिया सदृय आजाराची साथ आहे. तरीदेखील तालुक्यात इतर ठिकाणी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. डासांमुळे या आजारांची लक्षणे आहेत. त्यामुळे डास आढळणाऱ्या ठिकाणी ग्रामपंचायतींना धुराळणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईमुळे पाणी साठविण्याची त्या भागात मानसिकता दिसून येते. त्यातून आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. हे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आवश्यक दक्षता घ्यावी. मोरगाव : मोरगावसह परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. चिकुनगुण्निया, गोचीड ताप, स्वाईन फ्लू ,थंडी, ताप हे साथीचे आजार बळावत चालले आहेत. घरोघरी लोक आजारी असल्याने आरोग्य खात्यामार्फत तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.>मोरगाव परिसरात साथीच्या रोगाचे थैमानमोरगाव तरडोली या परीसरात साथीचे रोग मोठया प्रमाणात फोफावत चालले आहेत.मोरगाव येथील खाजगी दवाखान्यात रोज शंभर पेक्षा अधीक रूग्ण आजारी असल्याने तपासणी करण्यासाठी येत आहेत.पैकी ३० पेक्षा अधीक रूग्ण हिवताप, चिकण गुणीया , मलेरीया स्वाईन फ्ल्यू आदी आजाराने त्रस्त आहेत.हे साथीचे आजार बळावत चालले आहेत.नाझरे जलाशयातील मृत पाणीसाठयातुन १६ गावांना सध्या पाणी पुरवठा सुरू आहे.मात्र हे पाणी दुषीत येत असल्याने रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.साथीचे रोग बळावत असले तरी आरोग्य खात्याकडुन ही साथ अद्याप आटोक्यात आली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.या भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. दुबार पेरणीचे संकट समोर आहे.या दरम्यान साथीचे रोग आल्याने परीसरात डास निर्मुलन, निर्जंंतुकीकरण करण्याची मागणी होत आहे.>..घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे घरो घरी सर्व्हे करण्यात येत आहे. ज्या रूग्णांना ताप आला आहे ,त्यांची माहीती गोळा केली आहे.तसेच डास आळ्या पैदास केंद्र सर्व्हे केला असुन ग्रामपंचायतीला पत्र दिले आहेत.यावर उपाय योजना कण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे मोरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल वाघमारे यांनी सांगितले.>ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा : डॉ. वाघमारेमोरगाव : मोरगाव सह परीसरात हिवताप , चिकण गुणीया मलेरीया ,गोचीड ताप या विविध साथीचे रोग बळावत चालले आहेत. यासाठी ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा .तसेच डास उत्पत्ती केंद्र नष्ट करावी ,असे आवाहन वैद्यकीय अधीकारी अनील वाघमारे यांनी केले आहे.दुषीत पाणी व किटकजन्य विषाणु यांमुळे मोरगाव, तरडोली ,आंबी सह परीसरात ग्रामस्थ साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन मोरगाव आरोग्य खात्याकडून केले जात आहे. नाझरे जलाशयातुन पाणी खंडीत पाणी पुरवठा होत असला तरी कोरडा दिवस पाळल्यानंतर ही साथ बहुतांश आटोक्यात येईल ,असे डॉ वाघमारे यांनी सांगीतलेत्याचबरोबर आपापल्या पारीसरातील डास उत्पत्ती केंद्रे नष्ट करावीत .तसेच परीसरातील ग्रामपंचायंतींनी धुर फवारणी करण्यासाठी पत्र दिले आहेत. हे साथीचे रोग हवा व किटकांमार्फत पसरत असल्याने घरोघरी जाउन आरोग्य केंद्रांचे कर्मचारी ताप आलेल्या रूग्णांचा सर्व्हे करीत आहेत.मात्र, परीसरातील ग्रामस्थांनी यासाठी योग्य सहकार्य करून कोरडा दिवस पाळावा.