भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी प्रादेशिक आणि जागतिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार असून बदलत्या काळानुसार दोन्ही देश त्यांच्या संबंधांमध्ये नवीन क्षितिजे जोडत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागिदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात चर्चा झाली. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.
भारत आणि सौदी अरेबियाच्या मैत्रीमुळे चीन आणि पाकिस्तानची आतून घुसमट होत आहे. कारण या दोन देशांच्या वाढत्या जवळीकांमुळे आपण कुठेतरी दूर जाऊ शकतो, असे पाकिस्तानला वाटत आहे. अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात जी जवळीक वाढली आहे, त्याचा प्रभाव जगातील अनेक मोठ्या मंचांवर दिसून येत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ साली अशी दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.
महाराष्ट्रात ४४०० कोटी रुपयांचा ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प’ म्हणजेच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असून, त्यात सौदी अरेबियाची अरामको, अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि भारताची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एकत्र काम करत आहेत. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास वेग येणार आहे. याबाबत राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, भारत आणि सौदी अरेबियाच्या मैत्रीमुळे चीन आणि पाकिस्तानची आतून घुसमट होत आहे. कारण या दोन देशांच्या वाढत्या जवळीकांमुळे आपण कुठेतरी दूर जाऊ शकतो, असे पाकिस्तानला वाटत आहे. अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात जी जवळीक वाढली आहे, त्याचा प्रभाव जगातील अनेक मोठ्या मंचांवर दिसून येत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ साली अशी दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.