शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

पुनर्वसन न झाल्याचा बारवीला फटका

By admin | Published: August 24, 2016 3:20 AM

एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला

ठाणे/बदलापूर : पुरेसा अवधी हाती असूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या जागी भेट देऊन ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारी यंत्रणांनी धरणग्रस्तांची कशी चेष्टा चालवली आहे, त्याचा ‘आँखो देखा हाल’ मांडल्यावर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. पुनर्वसन न झाल्याचा फटका बसेल या भीतीपोटी त्यांनी अपेक्षेइतके पाणीच यंदा साठवले नाही. मात्र मंगळवारी पहाटे धरण भरल्याची माहिती देत पाठ थोपटून घेतली. धरणाची उंची वाढवून १८ वर्षे उलटूनही पुनर्वसनाचा तिढा सोडवता न आल्याने जिल्ह्यातील अनेक मनपांत यंदाही डिसेंबर महिन्यापासून पुन्हा १५ टक्के पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. एमआयडीसीचे अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नाहीत.पावसाळ्यापूर्वी सलग पत्रकार परिषदा घेऊन बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत भूमिका मांडणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी गावांचे पुनर्वसन करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे दावे केले होते. पाणीसाठा वाढत गेला की गावकऱ्यांना जबरदस्तीने हलवले जाईल, असे ते म्हणत होते. धरणाचे दरवाजे बसवण्याचे काम शिल्लक आहे. दरवाजे आलेही आहेत. पाण्याने योग्य पातळी गाठली की ते बसवले जातील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र ४० टक्के पाणीसाठा वाढल्यावर उरलेले पाणी सांडव्यातून सोडून दिले जात आहे. वास्तविक, पुनर्वसनात दुर्लक्ष केल्याने ६० टक्के पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे.>गावांची वेसही ओलांडली नाहीजी गावे धरणाच्या पाण्याखाली जाणार म्हणून एमआयडीसीचे अधिकारी गेले तीन महिने धावपळ करत होते, त्याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी मात्र आपला पवित्रा बदलला. गावांच्या वेशीपर्यंत पाणी गेले की आम्ही पाणी अडवणे बंद करणार होतो. तसे पाणी वेशीवर गेले, त्यामुळे उरलेले पाणी सांडव्यातून सोडून देण्यास सुरूवात झाल्याचे ते सांगत होते. असे होते, तर मग पुनर्वसनाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत का धाव घेतली, वेशीपर्यंतच पाणी जाणार होते तर मग गावांनी आंदोलन का सुरू केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.