विक्रमगड : तालुक्यातील कासपाडा येथील दहवर्षापूर्वी बांधलेली आंगणवाडी केंद्राची इमारतीची दैनी आवस्था झाली असून. आंगणवाडी केंद्राच्या वर्ती टाकलेले पत्रे फुटले आहेत. भिंतीला तडे पडले आसून, बाल विद्यार्थ्यांना खाली बसण्यासाठीचे फरशा उखडला असल्या कारणाने या ही इमारत बंद करुन कासपाडा परीसरातील पाटिलपाडा, कलमपाडा, कासपाडा, आलिवपाडा या चार पाडातील १४८ बाल विद्यार्थ्यांना एका घराच्या ओसरीचा आसरा घेत दाटी-वाटीने बाल संस्काराचे शिक्षण घ्यावे लागत आहे. बालकांमध्ये शालेय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, बालके कुपोषित राहू नयेत; तसेच प्राथमिकपूर्व शिक्षण देण्याच्या उद्देशाने अनौपचारिकशिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने अंगणवाड्यांची निर्मिती केली आहे. खोडो-पाडी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संस्काराचे बालकडू देण्याचे मुख्य उद्देश समोर ठेवून आंगणवाडी केंद्र सुरु करण्यात आली मात्र योग्य सुविधा नसल्याने व धोकादायक इमारतीमुळे तालुक्यातील कासपाडा परिसरातील १४८ बालकांना एका घराबाहेरील ओट्यावर दाटी वाटीने शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. त्यात बालकांना या ओट्याची जागा कमी पडत असल्याने. खेळण्या-बागडण्यासाठी बाहेरचा आसरा घ्यावा लागतोय. त्यांना बसण्यासाठी, बागडण्यासाठी, शिक्षणाचे प्राथमिक धडे प्रसन्न वातावरणात मिळण्यासाठी होत नाही या परिस्थितीमुळे बाल मनावर कसे संस्कार होणार असा प्रश्न विचारला जात आहे.(वार्ताहर)>जिल्हा विभाजनात नवीन इमारतीचा प्रस्ताव रखडलाकासपाडा इमारत अंत्यत धोकादायक आहे. इमारत दहा वर्षापूर्वीची जुनी आहे. त्यामुळे येथील ही इमारत बंद करून याच पाड्यातील एका घराचा ओट्यावर आंगणवाडी भरत आहे. जिल्हा विभाजनापूर्वी नविन इमारतीचा प्रस्ताव विक्र मगड पंचायत समितीचा बाल विकास विभागाने ठाणे जिल्हा परीषदे कडे तीन वर्षा पूर्वी पाठवला होता. मात्र जिल्हा विभाजन झाल्याने हा प्रस्ताव धूलखात पडून होता. या वर्षी पुन्हा कासपाडातील नविन इमारतीसाठी नविन प्रस्ताव पालघर जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याची माहिती विक्र मगड पंचायत समितीचा बालविकास विभागातील आधिकार्यनी दिली.कासपाडा परिसरातील पाटीलपाडा, कलमपाडा, कासपाडा, अलीवपाडा, या चार पाड्यातील १४८ बाल विद्यार्थी कासपाडा आंगणवाडी केंद्रावर शिक्षणासाठी येतात यातील सॅम-मॅमचे एकूण ४२ बालविद्यार्थी कुपोषित असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे उपचार सुरु असल्याची माहिती आंगणवाडी पर्यवेक्षिका जे.जे.किरकीरा यानी दिली.>या आंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांवर प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे उपचार सुरु आहेत. तसेच कासपाडा आंगणवाडीचा केंद्राचा प्रस्ताव नव्याने पालघर जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे.- जे.जे. किरकीरा(आंगणवाडी पर्यवेक्षिका, पंचायत समिती, विक्रमगड)
१४८ विद्यार्थ्यांना ओसरीचा आधार
By admin | Published: November 19, 2016 3:25 AM