शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांनी गाठला तळ

By admin | Published: July 07, 2014 3:14 AM

कोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेकोकणच्या सहा जिल्ह्यांपैकी एकट्या ठाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान सरासरी दोन हजार ४०० मिमी आहे. जून महिन्यात सुमारे ४०० ते ५५० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या या जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी केवळ १५९.६७ मिमी पाऊस पडला आहे. या वर्षी पावसाला सुमारे २४ दिवसांचा उशीर झाल्याने जिल्ह्यातील १९८ गावांना जवळपास अतिरिक्त २७ दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. तर भातलागवड एक ते दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.उन्हाळ्यात २०० गावांना ३७ टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पावसाने ओढ घेतली असती तर, टंचाईदेखील वाढत गेली. मात्र, मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन फेबु्रवारीत १४ टक्के पाणीकपात महापालिकांना लावण्यात आली होती. ती आजतागायत आहे. १५ जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण न वाढल्यास त्यानंतर मात्र जास्त पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. एक कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार ६२१ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर होत आहे. गावपाड्यांना दररोज ७.४६ दशलक्ष घनमीटर पाणी लागत आहे. २४ लघुपाटबंधारे आणि सहा केटी बंधाऱ्यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ५० दशलक्ष घनमीटर पाणी जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वापरले जात आहे. तर ३०८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर या उद्योगधंद्यांमधील कामगारांसाठी केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजपर्यंत एक हजार १७७.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज भातसा धरणात २७.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय, मोडकसागरमध्ये ४५.०५ टक्के, आंध्रात २१.३० टक्के बारवी धरणात ११.६६ टक्के सूर्याच्या कवडास व धामणीमध्ये अनुक्रमे ९७.९९ व ४५.७७ टक्के आणि तानसामध्ये ९.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. २ जुलैपर्यंत सरासरी ९२० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. प्रारंभीच्या पावसात शेतकऱ्यांनी भातरोपांसाठी सुमारे ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असता उर्वरित ३० टक्के पेरण्यांचे काम संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भाताची लागवड पूर्णत्वास येणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील एक लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र या वर्षी खरिपाखाली येणार आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर भाताची लागवड आहे. नागली १५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर तर वरी ११ हजार ३२० हेक्टर क्षेत्रात घेतली जात आहे. उर्वरितक्षेत्रावर तूर, मूग, उडीद आणि तीळ, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनवाढीसाठी ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर केला जाणार आहे. लांबलेल्या पावसावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भातपेरणीवर टँकरद्वारे पाणी फवारणी करून भाताची रोपे वाचवली आहेत.