शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

सरकारच्या दोन खात्यात बसेना मेळ; वस्त्रोद्याेगाचा बिघडलाय खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 11:00 AM

राज्य सरकारच्या दोन खात्यात मेळ नसल्याने वस्त्रोद्योगाचा खेळ बिघडत आहे.

अतुल आंबीइचलकरंजी (जि. कोल्हापूर) :

राज्य सरकारच्या दोन खात्यात मेळ नसल्याने वस्त्रोद्योगाचा खेळ बिघडत आहे. अर्थखात्याकडून ऊर्जा खात्याला अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने राज्यातील २७ अश्वशक्तीवरील सुमारे दहा हजार वीज ग्राहकांवर साधारण १५० कोटी रुपये पोकळ थकबाकीची टांगती तलवार आहे. त्यामध्ये ३३ टक्के रक्कम इचलकरंजीकरांची आहे. याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठी यंत्रमागधारक संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत.  

२७ अश्वशक्तीवरील ज्या यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही, त्यांचे अनुदान बंद करा, असा आदेश २९ डिसेंबर २०२१ रोजी शासनाने काढला. मात्र सर्वत्र जोरदार आंदोलने झाल्याने ८ फेब्रुवारी रोजी सवलत पूर्ववत करा, असा आदेश दिला. त्यावर ऊर्जा विभागाने सवलत पूर्ववत केली. परंतु डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या दोन महिन्याचे विनाअनुदानित बिल ग्राहकांना लागू केले होते. त्या थकबाकीबाबत पुन्हा यंत्रमागधारकांनी शासनदरबारी प्रयत्न केले.४ मे २०२२ रोजी ज्यावेळेपासून अनुदान रद्द झाले, त्यावेळेपासून अनुदान द्या, असा सुधारित आदेश सरकारने काढला. परंतु आजतागायत यंत्रमागधारकांच्या वीज बिलातून त्या दोन महिन्यांची थकबाकी कमी झाली नाही. उलट त्यावर व्याज व दंड लागू होत असल्याने रक्कम वाढत आहे. त्या दोन महिन्याच्या अनुदानाची रक्कम अर्थखात्याकडून ऊर्जा खात्याला मिळाली नाही. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे, तर ऊर्जा खाते काँग्रेसकडे आहे. या दोन्ही खात्यात मेळ नसल्याने असा पेच निर्माण झाल्याचे यंत्रमागधारकांतून बोलले जात आहे. 

१० हजार ग्राहकराज्यातील भिवंडी, मालेगाव, विटा, तारापूर, सोलापूर अशा विविध वस्त्रोद्योग क्षेत्रातील सुमारे दहा हजार ग्राहकांची १५० कोटींची थकबाकी आहे. त्यामध्ये ३३ टक्के इचलकरंजीचा वाटा आहे. शहरातील २,५५० ग्राहकांची ४८ कोटी थकबाकी आहे.महावितरणकडून ग्राहकांना नोटीसमहावितरणकडून १० जून २०२२ पासून ग्राहकांना थकबाकी भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. त्याची मुदत १५ दिवसाची आहे. त्यामध्ये शासनाने निर्णय न घेतल्यास वीज जोडणी तोडली जाणार आहे. त्यामुळे इचलकरंजीतून आंदोलन सुरू झाले आहे.

टॅग्स :businessव्यवसाय