शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

घरातच बनवली बॅटरीवरील सायकल

By admin | Published: March 14, 2017 1:44 AM

जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलापोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले

अंबरनाथ : जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलापोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले. घरातील आपली सायकल बॅटरीवर कशी चालेल, यावर विविध प्रयोग करुन स्वत:च्या सायकलीला बॅटरीवर चालवण्यास सुरूवात केली आहे. एवढयावरच तो थांबला नसून त्याने ही सायकल सोलार पॅनलवर कशी चालेल, याचाही प्रयोग सुरु केला आहे.अंबरनाथ आणि बदलापूरातील प्रसिध्द उद्योजक डी. एम. भोईर यांच्या मुलाने ही किमया केली आहे. आठवीत शिकणाऱ्या सुबोधला वडिलांनी सायकल घेऊन दिली. ती घेतल्यापासुन सुबोध तिला बॅटरीवर कसे चालवता येईल, याचा सतत प्रयत्न करत होता. इलेक्ट्रिकलचे कोणतेही ज्ञान नसतानाही माहिती संकलित करत तो सायकलवर सतत प्रयोग करत राहिला. विजेसोबत खेळण्याचा त्याचा हट्ट घरच्यांमध्ये धास्ती निर्माण करत होता. बॅटरी कशी चार्ज करता येईल याचा प्रयत्न त्याने यशस्वी केला. सायकलचे पॅडल मारुन डिक्कीमधील बॅटरी चार्ज करण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. त्यासाठी त्याने कोणाचीही मदत घेतली नाही, हे विशेष. घरासमोरील वेल्डरकडून सायकलमध्ये काही किरकोळ बदल मात्र करुन घेतले. बॅटरी चार्र्ज करण्यात यश आल्यावर त्याने बॅटरीच्या साह्याने मोटार चालवत सायकल पॅडलशिवाय चालवण्याचा प्रयोग सुरु केला. सायकलमधील बॅटरीच्या साह्याने मोटर सुरु करुन ती गती सायकलच्या चेनला देण्याचा टप्पा त्याने गाठला. नंतर सायकलमध्ये पुन्हा काही बदल करुन मोटारच्या साह्याने सायकलची चेन फिरविणारी यंत्रणा तयार केली. त्यामुळे समान वेगाने सायकल चालवण्यात त्याला यश मिळाले. मात्र चढणीवर आणि कमी वेगानेही सायकल चालविता यावी, यासाठी त्याने पुन्हा काही बदल सुरु केले. मोटारवर रेग्युलेटरची यंत्रणा उभारुन सायकलच्या हँडलला एक्सलेटर बसवत हव्या त्या वेगाने सायकल चालवण्याची यंत्रणा त्याने विकसित केली. त्याचा वापर सायकलमध्ये करुन त्याने एक्सलेटरवर आधारित बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. आता सायकलची बॅटरी सोलारवर चार्ज करण्याचे त्याचे प्रयत्न सुरु आहेत. (प्रतिनिधी)