शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

स्टार्ट-अप उद्योगासाठीबळ, पण अपुरे!!

By admin | Published: February 01, 2017 7:09 PM

अवघे एक वर्षाचे वय असलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’ या बहुचर्चित अभियानासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प काहीसा कडू-गोड ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - अवघे एक वर्षाचे वय असलेल्या ‘स्टार्ट अप इंडिया’ या बहुचर्चित अभियानासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प काहीसा कडू-गोड ठरला आहे.

बदलत्या बाजारपेठेच्या गरजा ओळखून त्याभोवती अभिनव उपायांच्या आधारावर नव्या उद्योगाची उभारणी करणारे ते तरुण आणि प्रयोगशील क्षेत्र निश्चलीकरणानंतर आर्थिक संकटात सापडले आहे. यातून तरण्यासाठी यावर्षीचा अर्थसंकल्प वाढीव करसवलतींचा हात देईल असा या क्षेत्राचा अंदाज होता. तसेच पंतप्रधानांच्या आश्वासनानंतरही स्टार्ट-अपच्या स्थापनेसाठी न आलेली प्रक्रियात्मक सुलभता या अर्थसंकल्पात साधली जावी, अशीही अपेक्षा होती. पण या दोन्हीही आघाड्यांवर नवउद्यमींच्या पदरी निराशा पडली आहे.

31 मार्च 2016 नंतर स्थापन झालेल्या स्टार्ट-अप कंपन्यांसाठी असलेली करातून सूट पहिल्या सात वर्षांपैकी तीन वर्षात घेता येईल, हा एकमात्र बदल या क्षेत्रासाठी संजीवक ठरणारा आहे. याआधी हा कालावधी ‘स्थापनेनंतर पहिली पाच वर्षे’ असा होता.त्यामुळे स्टार्ट-अप कंपन्यांना भांडवलाची उपलब्धता वाढेल.

मिनिमम अल्टरनेट टेक्स ‘कैरी फॉर्वर्ड’ करण्याची मुदतही दहा वर्षांवरून पंधरा वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.50 कोटी रुपयांच्या आतली उलाढाल असलेल्या मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कंपनी कराचे प्रमाण 30 वरून 25 टक्कयांवर आणण्याच्या निर्णयाचा या क्षेत्राला फायदा होणार आहे.

‘डिजिटल इंडिया’ योजनेला या अर्थसंकल्पात मिळालेली बळकटी मात्र स्टार्ट-अप कंपन्यांच्या क्षेत्राला उमेद देणारी ठरली आहे. तीन लाखांवरचा कोणताही व्यवहार रोखीत न करण्याच्या अर्थमर्यांच्या घोषणेमुळे डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विस्तारलेल्या शक्यता नव-उद्यम जगतासाठीच्या व्यवसायसंधी ठरणार आहेत.