शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

भाजपा-सेनेची ही लढाई लुटूपुटूची !

By admin | Published: February 12, 2017 5:50 AM

भाजपा आणि शिवसेनेची लुटूपुटूची भांडणे सुरू आहेत. माध्यमांचे सगळे लक्ष त्या भांडणाकडेच असल्याने विकासाचा अजेंडाच बाजूला गेला आहे. सत्तेतील या दोन्ही पक्षांना नेमके हेच हवे होते.

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

भाजपा आणि शिवसेनेची लुटूपुटूची भांडणे सुरू आहेत. माध्यमांचे सगळे लक्ष त्या भांडणाकडेच असल्याने विकासाचा अजेंडाच बाजूला गेला आहे. सत्तेतील या दोन्ही पक्षांना नेमके हेच हवे होते. परिणामी मुंबईत २० वर्षे आणि राज्यात गेली दोन अडीच वर्षे सत्ता भोगणाऱ्या भाजपा- शिवसेनेने नेमका विकास केला तरी काय? हे प्रश्नच चर्चेतून बाजूला फेकले गेल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.लोकमतशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजपा सरकारच्या दुटप्पी वागण्यावर सडकून टीका केली. पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, औषध खरेदी घोटाळा, तूरदाळीचा घोटाळा, विनोद तावडे यांचा वॉटर प्यूरीफायर खरेदीचा घोटाळा, पदवीचा घोटाळा हे सारे या मंत्र्यांनी केले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना राजकीय सोय म्हणून बाजूला केले गेले, पण अन्य मंत्र्यांना मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली आहे. हे कोणतेही विषय चर्चेत नको असल्याने दोघांनी आपापसातील भांडण सुरू केले आहे. ही जनतेच्या डोळ्यात सरळ सरळ धूळफेक असल्याचेही ते म्हणाले.आपण काही ठिकाणी राष्ट्रवादीशी तर काही ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेशी लढत देत आहात. या तिघांपैकी नेमका शत्रू कोण आहे?आमचा शत्रू फक्त भाजपा आहे. त्यांचे जातीयवादी राजकारण आणि संघांची मानसिकता यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बनवलेल्या देशाच्या राज्यघटनेलाच धोका निर्माण झाला आहे. अल्पसंख्यांकांना डिवचण्याचा त्यांचा डाव आहे. देशात राष्ट्रपती पद्धतीचा कारभार आणावा याकडे वाटचाल सुरू आहे. धर्माधारित व्यवस्था उभी करण्याचे त्यांचे प्रयत्न अल्पसंख्यांकांना अडचणीत आणणारे आहेत. त्यामुळेच भाजपाचा पराभव हेच आमचे ध्येय्य आहे.उद्या भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची वेळ आली तर?शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आणि त्याला दोन्ही काँग्रेसने थेट किंवा अप्रत्यक्ष सत्तेत पाठिंबा द्यायचा, अशी चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचे श्रेष्ठी याला मान्यता देतील की नाही मला माहिती नाही. राष्ट्रवादीची भूमिका यात संशयास्पद होती. ते आयत्या वेळी काय करतील हे पाहावे लागेल.राष्ट्रवादीने भाजपासोबत जायचे नाही असे जाहीर केले आहे. शिवसेना भाजपात भांडणे लावण्यासाठी त्यांनी त्यावेळी ती भूमिका घेतल्याचे अजित पवार म्हणाले.तसे असेल तर चांगलेच आहे. आता सेना-भाजपात भांडणे लागली आहेत, तेव्हा त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हरकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही हे स्पष्ट झाले तरच भाजपाला अडचणीत आणायला शिवसेना वेळ वाया घालवणार नाही. या भांडणांचा फायदा मुंबईत दोन्ही काँग्रेसने आघाडी केली असती तर झाला नसता का?फायदा झाला असता की नसता याहीपेक्षा मुंबईत दोन्ही काँग्रेसने आघाडी केली, हा संदेश गेला असता तर त्याचे राज्यात चांगले चित्र उमटले असते. दुर्देवाने मुंबईत आघाडी होऊ शकली नाही. आपापसातील मतभेद आमच्या जबाबदार नेत्यांनीही सोडवायला हवे होते. आमच्या मुंबईतच्या काही नेत्यांनीही हट्ट सोडायला हवा होता. पण ते झाले नाही. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत आघाडी करायला लावली होती. फायद्यापेक्षा त्यातून संदेश जाणे महत्त्वाचे होते.भाजपाने गुंडांना प्रवेश दिलाय. अन्य पक्षातील गुंडगिरी करणारे त्यांच्याकडे गेले..?आज संयमाने राजकारण करण्याची संस्कृती राहिलेली नाही. सत्ताधारी भाजपाने पक्ष बळकट करण्यासाठी वाट्टेल ते करणे सुरू केले आहे. स्वत:च्या सत्तेसाठी गुंडांना प्रवेश देणे हे संघाच्या संस्कृती वाढलेल्या अनेकांना मान्य नाही. भाजपाची ही भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आणि राजकारणासाठी दु:खद आणि खेदाची बाब आहे.सत्तेत राहणार नाही, असे शिवसेना म्हणत आहे. निवडणुकीनंतर शिवसेना बाहेर पडली तर...?पडली तर काय, याला अर्थ नाही. मुळात शिवसेनेने सत्तेत राहून सगळे फायदे घेणे चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी आधी काय ते स्पष्ट करायला हवे. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न सोडवता येईल.राज्यात तरी कुठे सगळीकडे दोन्ही काँग्रेसची आघाडी झालीय?ज्या ठिकाणी दोन्ही काँग्रेसमध्येच थेट स्पर्धा आहे, तेथे अडचण आहे. पण अनेक ठिकाणी आम्ही आघाडी केली आहे. आज भाजपाच्या पराभवासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही सत्तेत असताना सेना- भाजपाचे आव्हान नव्हते. यावेळी भाजपाच्या चंचुप्रवेशाने ते निर्माण झाले. अजित पवार व माझ्यात मतभेद नव्हतेच, गैरसमजही झाले दूर !आमच्यात मतभेद नाहीत आणि नव्हते. पण काही गैरसमज झाले होते. मी माझ्या परिने ते दूर करण्याचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना कोणतेही निर्णय राजकीय परिप्रेक्षातून घेतले नाहीत. काय घडले ते सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा बोलण्यात अर्थ नाही. पण माझ्या मनात आज कोणतेही गैरसमज नाहीत. भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे एवढेच मी सांगेन.