शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

राष्ट्रवादीसोबत आता आरपारची लढाई : हर्षवर्धन पाटील यांचे भाजपप्रवेशाचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 7:37 PM

इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली?..

ठळक मुद्देलबाड आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी आता काम नाही 

कळस: वाघ म्हणलं तरी खातो अन् वाघोबा म्हणलं तरी खातो.  लबाड व फसवणुकीचे राजकारण करणाºयांसाठी आता काम करणार नाही.  मी नेहमीच संयम बाळगला होता, पण आता  आरपारची लढाई होणार असा इशारा काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी दिला. काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या बैठकीनंतर इंदापूरची जागा आपल्यासाठी सोडली जाणार नाही हे स्पष्ट झाल्यावर पाटील यांनी तातडीने इंदापूर येथे मेळावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.  

पाटील म्हणाले,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेला तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला  विधानसभेला जागा देतो असे आश्वासन दिले. खासदार सुप्रिया सुळे यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही इंदापुरला तुम्हाला पाटील यांचे काम करावे लागेल, असे सांगितले.  अजित पवार यांनी ही पवारसाहेबांचा निर्णय मान्य असेल असे सांगितले.  मात्र, इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली? २३ एप्रिलला  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असताना आज ४ सप्टेंबर तारीख उजाडली तरी इंदापूरची जागा सोडण्याबाबत राष्ट्रवादीचा एकही वरिष्ठ नेता बोलत नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळे लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही. आघाडीच्या बैठकीत जुन्नरची जागा सुटली पण इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून  काही दिवसांत आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे  असे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत  दिले. यावेळी  कर्मयोगी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पदमा भोसले, सभापती करणसिंह घोलप, निरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुरलीधर निंबाळकर, कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, रमेश जाधव, बाळासाहेब डोंबाळे, अंकिता पाटील,दिपक जाधव,उपस्थित होते

मुख्यमंत्र्यांचे कौतुकमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक   करताना पाटील म्हणाले, साडेचार पाच वर्षात आपण सत्तेत नव्हतो. कुठल्या पदावर नव्हतो  विधानभवन मंत्रालयात गेलो, तर मुख्यमंत्र्यांनी कधी आपल्याला कोणत्या कामासाठी नाही म्हटलं नाही.   लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उभं राहण्याची मला किंवा पद्मा भोसले यांना आॅफर होती. मात्र आघाडीत असल्याने मी नकार दिला. तरीही मुख्यमंत्र्यांनी मनात राग ठेवला नाही. पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित राहण्यासाठी कॅबिनेट बैठकीच्या वेळेत बदल करून घेतले. दिलेला शब्द पाळणार नेता असल्याच्या  शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

उपस्थितांनी केला भाजपाचा घोषपवार घराण्याकडून सातत्याने १९९१ पासुन अन्याय झाल्याचे पाटील यांनी सांगितले. शंकरराव पाटील   यांचेही साखर संघाचे अध्यक्ष पद व खासदारकीचे तिकीट याच मंडळींनी कापले. १९९५ पासुन मी सहन करत आलोय मात्र आता फसवणाºया माणसांपेक्षा काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे  त्यांनी सांगितले. आता पुढे काय करायचे असा सवाल त्यांनी उपस्थितांनी केला. यावेळी भाजप असा आवाज आला. तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर करू, असे पाटील यांनी सांगितले.  यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत, तत्कालीन युती शासनाचे कौतुक केले.

टॅग्स :Indapurइंदापूरcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकPoliticsराजकारण