शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

भाजपच्या बालेकिल्ल्यात अस्तित्त्वाची लढाई

By admin | Published: January 31, 2017 3:34 PM

भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत.

मुंबई : भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत. याची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या पालिकेच्या भ्रष्टाचाररुपी रावण दहनावरुन झाली आहे. याचाच फायदा उचलून दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी, मनसे आणि कॉंग्रेस आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे. मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी असे काही डोंगराळ भागातील झोपडपट्टी सोडल्यास टोलेजंग इमारतींनी हा परिसरत व्यापला आहे. जवळपास पावणे चार लाखांची लोकसंख्या असलेल्या मुलुंडमध्ये गुजराती भाषिक अधिक आहे. तर मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, गव्हाणपाडा, नाणेपाडा अशी मराठी वस्तींचा यात समावेश आहे. नवीन वॉर्ड रचनेमुळे कुठे खुशी कुठे गमचे चित्र पहावयास मिळते. पक्षांतर्गतच युद्ध पेटल्याने यात आणखीनच रंग चढत आहे.मुंबई शहराचे उपनगर असलेले मुलुंड हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडून आहे. शिवाय पूर्व उपनगरातील कालिदास नाट्यगृह याच परिसरात आहे. तर मुलुंड, भांडुप, कांजूर मधील रहिवाशांसाठी असलेले अग्रवाल रुग्णालयही याच भागात आहे. अशी महत्त्वपूर्ण ठिकाणे असलेल्या मुलुंडमध्ये सध्या हरिरोम नगर डम्पिंग ग्राऊण्डचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा मुद्दा घेऊन नेतेमंडळीच्या श्रेय लाटण्याचे राजकारणही दिसून येत आहे. तर काही जण पश्चिमेकडील वन विभागाच्या मुद्दयावर निवडणुकीत उतरणार आहे. या व्यतिरिक्त झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते, नाले, पाणी या देखील प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे अशात नगरसेवकासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु झाली आहे. मुलुंडमधील सहा प्रभागांपैकी १०५ आणि १०७ हा महिलांसाठी खुला झाला आहे. तर १०३, १०६, आणि १०८ हा सर्वसाधारण खुला झाला असून १०४ हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) झाल्याने सर्वांचीच पळापळ सुरु आहे. मुलुंडमध्ये भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची याच भागात आमदारकीची चौथी वेळ अहे. अशात भाजपाचे मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, समीता कांबळे हे तीन नगरसेवक आहे. तर राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती, मिनाक्षी सुरेश पाटील, मनसे नगरसेविका सुजाता पाठक आहेत. अशात नवीन वॉर्ड रचनेमुळे वैती आणि गंगाधरे यांचा वॉर्ड महिला झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. गंगाधरे १०४ मधून तर वैती १०६ मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर नव्याने तयार झालेल्या १०३ वॉर्डमधून भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी फिल्डींग लावली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गुजराती वर्गाबरोबरच उच्च भ्रू लोकवस्तीचा भरणा आहे. मात्र अखेर पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जर पक्षाने उभे केले नाही तर अनेक जण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. यावेळी शिवसेना भाजप मध्ये रावण दहनावरुन सुरु असलेल्या वादाचा तणाव निवडणुकीत रंगणार आहे. सेनेचा वडापाव हातून गेल्याने भाजप कार्यकत्यांना जिलेबी फाफड्या बरोबरच बिर्याणीचे बेत आखण्यासाठी आर्थिक गणित मांडली जात आहे. आतापासून त्यांनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे. मतदारांना खुश करण्यासाठी हिशोबांची मांडणीही सुरु केली आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये तरी निवडणूकीत पैशांचा पाऊसात उमेदवार, कार्यकर्ते यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. .............................प्रभाग क्रमांक - १०३आरक्षणखुलालोकसंख्या एकूण- ६१०७१अनुसूचित जाती - ३१५३अनुसूचित जमाती -९५६ व्याप्ती - भांडूप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा या प्रमुख ठिकाणांचा यात समावेश आहे. ........................प्रभाग क्रमांक - १०४आरक्षणइतर मागासवर्गीयलोकसंख्या -एकूण- ५९०९७अनुसूचित जाती - ५५९१अनुसूचित जमाती - ११६७व्याप्ती -तांबेनगर, इंदिरानगर, सिद्धार्थनगर....................प्रभाग क्रमांक - १०५आरक्षणखुला(महिला)लोकसंख्या - एकूण- ५२९६२अनुसूचित जाती - २४८५अनुसूचित जमाती - १२८८व्याप्ती - गव्हाणपाडा,निलमनगर, सज्जनवाडी, पाटीलनगर, डॉ.आंबेडकरनगर.....................प्रभाग क्रमांक - १०६आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ४९९५६अनुसूचित जाती - २७०७अनुसूचित जमाती - १२९७व्याप्ती -हरि ओमनगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर......................प्रभाग क्रमांक - १०७आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या - एकूण- ६१२३५अनुसूचित जाती - २०४६अनुसूचित जमाती - १०७८व्याप्ती - नाहूर गावठाण, मुलुंड बेस्ट बस डेपो, सेंट पायस कॉलनी......................प्रभाग क्रमांक-१०८आरक्षणखुलालोकसंख्याएकूण-५७१४२अनुसूचित जाती -७२३२अनुसूचित जमाती -१०९८व्याप्ती - राहूलनगर, मोतीनगर, हनुमानपाडा, आशानगर................२०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)वॉर्ड क्र९८विजयी उमेदवारसमीता कांबळे (भाजप)- ८३६५पराभूतनंदा प्रभाकर कांबळे (कॉंग्रेस) - ७९८०..................वॉर्ड क्र९९विजयी उमेदवारभावना जोबनपुत्रा (भाजपा)-९२७५पराभूतमिनाक्षी सुरेश पाटील (राष्ट्रवादी) - ८५०१( दरम्यान बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी भावना जोबनपुत्रा अपात्र ठरल्या).................... वॉर्ड क्र१००विजयी उमेदवारनंदकुमार वैती (राष्ट्रवादी) - ९१२६पराभूतसत्यवान दळवी (मनसे) -८८१०.................... वॉर्ड क्र१०१विजयी उमेदवारसुजाता पाठक (मनसे) -९७२०पराभूतज्योती वैती (शिवसेना) -८८१४ ..................... वॉर्ड क्र१०२विजयी उमेदवारप्रकाश गंगाधरे (भाजपा) - १०५५० पराभूतउत्तम गिते (कॉंग्रेस)- ८६२३....................वॉर्ड क्र१०३विजयी उमेदवार मनोज कोटक (भाजप) - ९३०२पराभूतजयप्रकाश शेट्टी (कॉंग्रेस) -७४७४...................