शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे

By admin | Published: October 17, 2016 1:03 AM

उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे.

पुणे : अलीकडच्या काळात कविता समजणे, साहित्याचे वाचन करणे, उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता, पळवाट न शोधता लेखकाने अभिव्यक्त झाले पाहिजे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रविवारी व्यक्त केले.श्रीरंजन आवटे लिखित ‘सिंगल मिंगल’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ््यात मंजुळे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ कथाकार व नाटककार जयंत पवार, राजहंस प्रकाशनच्या विनया खरपेकर उपस्थित होते. या वेळी कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन करण्यात आले.मंजुळे म्हणाले, ‘‘साहित्य कलाकृतीतून आरसा दाखविण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेकांना त्यातून चेहऱ्यावरची घाण दिसत असते. त्यामुळे आरसा तोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हा आरसा टिकवण्यावर भर द्यायला हवा. माणसांना एकाकीपणाने ग्रासले असून हे थांबविता येणार नाही. चांगल्या अभिव्यक्तीतून माणूसपण चांगल्या पद्धतीने सांगता येते. क्रांतीच्या आणि दगडफेकीच्या काळात कविता सुचणे ही चांगली गोष्ट आहे. तसेच काही माणसांना आपल्याला नेमके काय हवे आहे, हे सांगता येत नाही. परंतु, अशाच गोष्टी श्रीरंजन आवटे यांनी कादंबरीच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.’’ आपल्याला काय हवे आहे, आपली मागणी काय आहे, हेच माहित नाही तरी आपण गडबड करतो. इतरांवर राग काढतो, असे सूचक वक्तव्य मंजुळे यांनी केले. श्रीरंजन आवटे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका सांगितली. विनया खरपेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)>साहित्य हा समाजाचा आरसा दाखवत असतो. तेच या कादंबरीतून दिसते. ‘सिंगल मिंगल’मध्ये तरुण पिढीच्या मनात सुरू असलेले कलह चित्रित केले आहेत. कादंबरीमधील पात्र पूर्वीच्या रिलेशनशिपच्या आठवणी विसरत नवनवीन रिलेशनशिप शोधत आहेत. ही भारतीय मानसिकता आहे. जागतिकीकरणानंतरच्या तरुण पिढीचे प्रतिबिंब या कादंबरीत दिसून येते.- जयंत पवार