शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शिवस्मारकाच्या खर्चाबाबत तारतम्य बाळगा

By admin | Published: January 05, 2017 3:56 AM

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही.

ठाणे : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, त्याला आमचा विरोध नाही. परंतु त्यावरील खर्चाबाबत तारतम्य बाळगणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. सध्या गेटवे आॅफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेतच, त्यामुळे त्यांच्या स्मारकावर किती पैसे खर्च करावेत याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.बुधवारी मुंब्य्रातील स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सहकारी साखर कारखाने विक्रीतील कथित घोटाळ्याबाबत ज्येष्ठ समजासेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर पवार म्हणाले, या निमित्ताने अण्णांनी त्यांच्या विरोधात बोलण्याची संधी दिली याचा मला आनंदच होत आहे. समाजसेवक म्हणून किती दिवस गप्प बसायचे? सल्लामसलत करुन त्यांच्यावर खटला दाखल करणार असून आता न्यायालयातच त्यांना उत्तर दिले जाईल. गडकरी पुतळा उखडणे दुर्दैवीनाटककार राम गणेश गडकरी उत्तम साहित्यिक होते, सामाजिक लिखाणातून त्यांनी आपली विचारधार व्यक्त केली. त्यांच्या पुतळ््याची विटंबना होणे ही अतिशय दुर्दैवी व निषेधार्ह घटना आहे, असे ते म्हणाले.नोटाबंदीमुळे मर्यादित जागा लढविणारपाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. गोव्यात पहिल्यापेक्षा अधिक जागा लढवू. परंतु निवडणुका लढविण्यासाठी देखील पैसे लागतात. नोटबंदीमुळे आता निवडणुकीसाठी पैसे कोणत्या बँकेतून आणायचे, असा पेच सध्या आम्हाला पडला असल्याने आम्ही मर्यादीत जागेवरच निवडणुका लढविणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.मैदानात काय खेळायचे हे त्यांनी सांगायचे का ?क्रिकेटच्या खेळात पारदर्शकता आणण्यासाठी ज्या समितीवर सहा कोटींचा खर्च करण्यात आले. त्याच समितीने क्रिकेटच्या बाबत अशा पध्दतीने निर्णय देणे योग्य नाही. क्रिकेटचे मैदान रिकामे असताना त्याठिकाणी टेनिस खेळावे असा सल्ला दिला जात आहे. क्रिकेटच्या मैदानावर काय खेळायचे ते आता यांनी आम्हाला सांगायचे का, अशा शब्दात पवार यांनी न्या. लोढा समितीच्या शिफारशींची खिल्ली उडवली.