शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

सुंदर साजिरा श्रावण आला...

By admin | Published: August 02, 2016 5:21 PM

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा

-  विजय बाविस्करश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे... बालकवींनी या गीतातून वर्णिलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना. भारतीय वर्षगणतेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून ह्यश्रावणह्ण नाव या महिन्याला पडले. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण... श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते. याच महिन्यात जाईजुई, पारिजात, सोनचाफा इ. फुलांच्या वेलींना व झाडांना बहर येतो व त्यांच्या सुवासाने आसमंत दरवळून जातो. श्रावणातल्या संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग, विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्या वेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते. या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी श्रावणात घन निळा बसरला रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा असे यर्थाथ वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते धर्मकृत्य असते; पण त्यातील सोमवार हा विशेष मानतात. दर सोमवारी फक्त रात्री एक वेळ जेवून शिवव्रत करण्याची प्रथा आहे. दर मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात. तर, भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून सवाष्णीला पुरणपोळीचं जेवण घालतात. संध्याकाळी स्त्रियांना हळदी-कुंकू देतात. रविवार म्हणजे आदित्यवार. या दिवशी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. शुद्ध पंचमीला नागाची पूजा करून नागपंचमी साजरी होते. आजही कविवर्य गदिमांनी लिहिलेले व भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले ह्यफांद्यावरी बांधिले गं मुलिंनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओलेह्ण हे गीत स्त्रीवर्गात तितकेच लोकप्रिय आहे. श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नदी आणि समुद्रालगत राहणारे कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते. याच दिवशी सुताची पोवती करून विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात म्हणून या तिथीला पोवती पौर्णिमाही म्हणतात. याच दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करण्याची ब्राह्मण पुरुषांची परंपरागत प्रथा आहे. या विधीला श्रावणी असे म्हणतात. श्रावणातल्या वद्य अष्टमीला श्रीकृष्णांचा जन्मदिन असतो. म्हणून तिला जन्माष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणतात. नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हटले जाते. गावागावांमधून या दिवशी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. गीत, वाद्य वगैरेंच्या साह्याने घरोघरी तो उत्साहात साजरा होतो. या दिवसांत राधा-कृष्णांची पूजा करतात. घरोघरी कृष्णचरित्रातील काही भाग नाट्यरूपात सादर केला जातो. कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, या समजुतीने गीत, नृत्य, नाट्य यांच्या द्वारे हा उत्सव साजरा करतात. तसेच, या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने अंगावर उडवतात. आषाढात सुरू झालेल्या चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दात सांगयचे तर -हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आलाकवींना भुरळ घालणारा, सृजनाला आवाहन करणारा असा हा आनंदाचा धनी असलेला श्रावण खरोखरच मनभावन आहे.