निनाद देशमुख
रिसोड, दि. १६ - शहरात गत दोन दिवसांपासून ७ ते ८ वर्षिय चिमुकली दोरीवर चालून जिवघेणी कसरत भररस्त्यावर करीत आहे, परंतु नागरिकांकडे चिल्लरचं नसल्याने कोणीही त्या मुलीच्या कसरती पाहत नसल्याचे बुधवारी दिसून आले.रिसोड शहरामध्ये एका ७ ते ८ वर्षिय चिमुकलीसह तीचे आईवडिल जिवघेणी कसरत करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहे. दोरीवर चालतांना गाण्यावर दोरीवरचं नृत्य करणे, दोरीवरुन चालतांना विविध कसरती करण्याच प्रयोग ती करुन दाखवित आहे.
काही दिवसाआधि म्हणजेच ५०० , १००० रुपयांच्या नोटा रद्द होण्याआधी इथे नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी असायची पण गत दोन दिवसांपासून रस्त्यावर चालत असलेल्या या जिवघेण्या चिमुकलीच्या कसरतीकडे कुणीही ढुंकून पाहत नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात तेथून जाणाऱ्या नागरिकांशी चर्चा केली असता आपल्याजवळच चिल्लर पैसे नाही त्या मुलीला काय दयावे म्हणून येथे कोणीच थांबत नसल्याचे सांगण्यात आले.