पुणे, दि. 22 : 'त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो' या वक्तव्यामुळे मी महिनाभर दिल्लीला जाण्याचे टाळले, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
देशहितासाठी पक्षीय अभिनिवेश विसरून एकमेकांना मदत करण्याची भुमिका प्रत्येकाची असायला हवी. राजकारणात माझ्याबद्दल गैरसमज केला जातो. मध्यंतरी एक वक्तव्य आले, ‘त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो,’ यामुळे भयंकर काळजीची परिस्थिती निर्माण झाली. कारण हे सांगणारी व्यक्तीच अशी होती. दिल्लीत सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटायचेही टाळत होतो. पण राजकारणात व्यक्तिगत सलोखा ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पावले टाकावी लागतात, अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.
कै. धनंजय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाºया कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. माजी आमदार मोहन जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एस. एम. जोशी सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष बापट, आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, वात्रटिकाकार रामदार फुटाणे, शुभांगी थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अन्नपुर्ण परिवारच्या अध्यक्षा डॉ. मेधा पुरव सामंत, शिल्पकार विवेक खटावकर, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांना पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धनंजय थोरात पुरस्कार निवड समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असल्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, बापट, जोशी व काकडे यांच्या राजकीय भुमिका वेगळ््या असल्या तरी ते जीवभावाचे मित्र आहेत. निवडणुकीवेळी ते प्रामाणिकपणे काम करतात. याप्रकारची भुमिका राजकारणातही असायला हवी. काँगे्रसच्या उमेदवारासाठी मी सख्या भावाविरोधात प्रचार केला. मोठ्या भावानेही मला प्रोत्साहित केले. तुमची विचारधारा काहीही असली तरी देशासाठी ताकदीने काम करणाºयांना मदत करायला हवी. मी कृषीमंत्री असताना नरेंद्र मोदी यांची भुमिका केंद्रविरोधी असायची. पण त्यांनी त्यावेळी शेतकºयांसाठी सुरू केलेल्या कामामुळे मी त्यांच्या पाठिशी उभा राहिलो. त्यामुळे कदाचित ते माझे बोट धरून आल्याचे बोलले असतील, असे पवार यांनी नमुद केले. आयुष्यभर कार्यकर्त्यांनी कसे काम करावे, याचा आदर्श थोरात यांनी कृतीतून घालून दिल्याचे पवार यांनी सांगितले.