शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

अहवालामुळे ‘त्या’ चौघांचे धाबे दणाणले

By admin | Published: October 27, 2015 2:09 AM

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या अहवालात पालिकेतील चार नगरसेवकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे

ठाणे : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या अहवालात पालिकेतील चार नगरसेवकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, पोलिसांनी ती नावे देण्यास नकार दिला असला तरी रविवारी दिवसभर त्या चौघांची नावे व्हॉट्स अ‍ॅप आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे यातील काहींनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, या चौघांनीही फोन घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यावरील संशय आणखी वाढला आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी अद्याप त्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाहीत. परंतु, रविवारी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे महापालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची नावे व्हायरल झाली आहेत. यासंदर्भात रविवारी या चौघांशी संपर्क होऊ न शकल्याने सोमवारी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोनवर त्यांचे पीए अथवा सहकारी होते. साहेब बिझी आहेत. साहेब मिटिंगमध्ये आहेत, असे सांगून त्यांनी संपर्क साधण्यास नकार दिला. परंतु, व्हॉट्स अ‍ॅपद्वारे त्यांची नावे व्हायरल झाल्याने चौघांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यातील दोघांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘तो’ तपशील थेट न्यायालयात सादर करणारसूरज परमार यांच्या ‘सुसाइड नोट’च्या अहवालातील नावांचा तसेच इतर सर्व तपशील हा थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे. ज्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे या अहवालाच्या अनुषंगाने चर्चेत आली, त्यापैकी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. यासंदर्भात ठाणे महापालिकेतील १० ते १२ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. आर्थिक व्यवहारासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी परमार यांचा मोबाइल आणि लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असल्याचेही ते म्हणाले. मात्र, ‘सुसाइड नोट’ संदर्भातील तपशील थेट न्यायालयात सादर करण्यात येणार असल्यामुळे गोपनीयता बाळगली जाणार आहे. या समूहाचे बांधकाम प्रकल्प मंजुरीसंबंधीची कागदपत्रे तपासण्यात येत असून, ही प्रक्रिया कशी असते, याचा अभ्यास करण्यात येत आहे. यामागे राजकीय दबाव होता का, याची चाचपणी करण्यात येत आहे. या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कलम लावल्याने संबंधित कथित आरोपींची बँक खाती तसेच मालमत्तेची तपासणी होण्याची शक्यता असल्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)