शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

आम आदमी बनून बघा

By admin | Published: April 26, 2016 6:14 AM

आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

मुंबई : शासकीय अधिकारीपदाची झुल बाजूला ठेवून काही क्षणांसाठी आम आदमी बना म्हणजे सामान्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची आपल्याला कल्पना येईल, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शासकीय आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (आयआयपीए) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती व्याखानमालेंतर्गत राजन यांचे, ‘स्टार्टअप इंडिया’ विषयावर मंत्रालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडियांतर्गत अतिशय लहानलहान व्यावसायिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यावर भर द्यायचा उद्देश समोर ठेवून अधिकाऱ्यांनी वागणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून समजवून घ्याव्या लागतील. स्टार्ट अप इंडियासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक असून त्यासाठी वेगेवेगळ्या नियमनांची संख्या कमीत कमी करणे, करपद्धती अधिक पारदर्शक करणे, शिक्षण, आरोग्य आणि विम्याची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज देण्याची पद्धत सुलभ करणे, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी उत्तम समन्वयाचे आणि विश्वासाचे नाते जपणे यावर भर दिला पाहिजे. कारण या उद्योजकांभोवतीच स्टार्ट अप इंडियाची संकल्पना केंद्रित आहे. आयआयपीएचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी राजन यांचे स्वागत केले. सचिव विजय सतबिर सिंग यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनीही विचार व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)