ऑनलाइन लोकमत -
बीड, दि. 25 - ओव्हरटेक केलं म्हणून 25 जणांच्या जमावाने 2 तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सावरगाव गावात ही घटना घडली आहे. पिडीत तरुण दुचाकीवरुन आपल्या मित्रांसोबत जात असताना ओव्हरटेक केल्याचा रागात त्यांना थांबवून मारहाण करण्यात आली. दलित असल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. आरोपींना अजून अटक करण्यात आली नसून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
'आमच्या गाडीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला, त्यानंतर आम्हाला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. आम्हाला मारुन टाकणार होते. दुचाकीवर बसवून त्याने मला नेलं, धमकी दिली आणि जातीवरुन अपशब्द वापरले', असं पीडित 23 वर्षीय तरुण आकाशा वाघमारे याने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. पोलिसांना 23 अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
'त्यांच्या शरिरावर असणा-या जखमांवरुन त्यांना पट्ट्याने मारहाण झाल्याचं दिसतं आहे. या दोघांसोबत त्यांचे अजून चार मित्रही होते, मात्र त्यांनी आपला जबाब दिला नसल्याने पुर्ण घटना कळू शकलेली नाही. आम्ही गुन्हा नोंद केला आहे', अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक हरी बाळाजी यांनी दिली आहे.
Maharashtra: Two Dalit youth beaten up by 25 people allegedly for overtaking in Beed (24/7) pic.twitter.com/0Ehh18Cz3q— ANI (@ANI_news) July 25, 2016
Accused haven't been arrested. We are ascertaining details: Hari Balaji, Deputy SP (Majalgaon)on Dalit youths beaten pic.twitter.com/DYsUdbwPEo— ANI (@ANI_news) July 25, 2016