शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भीक मागणारी मुले केली गायब!

By admin | Published: January 10, 2016 11:02 PM

सांगली, मिरजेत छापे : ‘आॅपरेशन स्माईल’चा परिणाम; तीन मुली सापडल्या

सचिन लाड -- सांगली वाट चुकलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेचा चांगलाच परिणाम झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्या टोळीने या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. मुलांमार्फत पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी या टोळीने मुलांनाच गायब केले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात सांगली, मिरजेत भीक मागणाऱ्या एकाही मुलाचे दर्शन झालेले नाही. खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय. या वयात त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरविले जात असल्याचे चित्र शहरात दररोज पाहायला मिळते. चार ते बारा वयोगटातील ही मुले हातात ताट व ताटात देवीची मूर्ती ठेवून रस्त्यावर दिसेल त्या व्यक्तीकडे भीक मागताना दिसतात. ही मुले कुणाची? त्यांना ज्यांनी जन्माला घातले ते कुठे आहेत? ते काय करतात? असे प्रश्न या मुलांना पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाहीत. ही मुले स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटुंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात असे नाही, तर त्यांच्या माध्यमातून भीक मागणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जात आहे. सांगली, मिरजेत अनेक सामाजिक संस्था आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत. मात्र तरीही बालभिकाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यास कुणाला वेळ नाही.भीक मागणाऱ्या मुलांना रिक्षातून सांगलीतील राम मंदिर व मिरजेतील रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी अकराला सोडले जाते. त्यानंतर त्यांना दुपारी एक वाजता नेण्यासाठी पुन्हा रिक्षा येते. दोन तासात भीक मागून वीस रुपयेही गोळा होत नाहीत. थंडीचा कडाका वाढला असताना मुलांच्या अंगावर स्वेटरही नसतो. या मुलांची भेट घेऊन चौकशी केली, तर ते शिकवल्यासारखे ठराविक उत्तर देतात. यामध्ये ते शाळेला जातोय, पण आज सुट्टी असल्याने भीक मागायला आलो आहे, आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचे निधन झाले आहे, असे सांगतात. ही मुले एकमेकांची फार काळजी घेतात. चार वर्षाचं लेकरू सोबत असेल तर त्याची आपुलकीने काळजी घेतात.‘आॅपरेशन स्माईल’ ही मोहीम राबविणाऱ्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून अशा मुलांवर वॉच ठेवला आहे. मुले गेली कुठे?‘आॅपरेशन स्माईल’ या मोहिमेंतर्गत वाट हरविलेल्या मुलांचा शोध घेतला जातो. पण भिकेसाठी त्यांचा वापर केला जात असेल, तर त्याचीही दखल घेतली जाते. त्यानुसार सांगली व मिरजेत मुलांचा शोध सुरू आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी भीक मागणाऱ्या मुलांना रातोरात गायब करण्यात आले आहे. सांगलीत काँग्रेस भवन परिसरात केवळ तीन मुली सापडल्या. या मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे पालक अद्याप पुढे आलेले नाहीत. यावरुन या मुली अनाथ असून, त्यांचा भिकेसाठी वापर केला असण्याची शक्यता आहे. पण अन्य मुले गेली कुठे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दयेसाठी दयनीय अवस्था भीक मागण्यासाठी ज्या लहान मुलांचा वापर आणि उपयोग केला जातो, त्यांना पुरेसे खाण्यास दिले नसल्याचे त्यांच्या तब्येतीवरुन दिसून येते. या मुलांकडे पाहून कुणालाही दया आली पाहिजे, अशाच अवस्थेत त्यांना ठेवले जातेडोळ्यात तरळतात अश्रू...भीक मागणाऱ्या मुलांकडे पाहिले तर, डोळ्यात अश्रू उभारतात. अंगावर धड कपडे नाहीत, केस वाढलेले, पायात चप्पल नाही. शर्टाची बटणे तुटलेली, डोळ्यावर प्रचंड ताण, पोट खपाटीला गेलेले असते. या मुलांना पाहून अनेकांना दया येते. यामुळे काहीजण भीक देतात, तर काहीजण भिकेचा फंडा म्हणून त्यांना झिडकारतात. या कोवळ्या मुलांना भीक मागायला कोण लावतो, यामागचे अर्थकारण काय, याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही.