सातारा : सत्तेत येताना ‘वन रँक, वन पेन्शन’ लागू करू, असे सांगणाऱ्या भाजपाने कोलांटी उडी घेतली; मात्र आमच्यासाठी सरकार कुणाचे आहे, पक्ष कुठला आहे, याचे देणे-घेणे नसून, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही; तर आमचा हक्क मागतोय, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शन संघटनेच्यावतीने सातारा येथे ‘वन रँक, वन पेन्शन’ या मागणीसाठी रविवारी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अण्णा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ‘वन रँक, वन पेन्शन’ तीन महिन्यांत लागू करा, असा आदेश दिलेला असतानाही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही.त्यामुळेच येत्या २ आॅक्टोबरला दिल्ली येथील रामलीला मैदानावर सरकारला जाग आणण्यासाठी देशभरातून माजी सैनिक जमणार आहेत. (प्रतिनिधी)
भीक नव्हे, हक्क मागत आहोत !
By admin | Published: August 24, 2015 1:28 AM