शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

बालभारतीकडून पुस्तक वितरणास सुरुवात

By admin | Published: May 17, 2016 1:53 AM

बालभारतीकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली

पुणे : बालभारतीकडून २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १० कोटी पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. यंदा इयत्ता सहावीची नवीन पुस्तके छापली असून, मराठी माध्यमाची सहावीची सर्व पुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अनुदानित शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या वितरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पुस्तक छपाईचे काम बालभारतीकडे सोपविले आहे. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बालभारतीकडून मोफत पुस्तकांचे वितरण केले जाते. दर वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, या उद्देशाने आवश्यक नियोजन केले जाते. तसेच, काही पुस्तके विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून दिले जातात. विक्रीसाठीची पुस्तके व सर्व शिक्षा अभियानांतर्गत वितरित केली जाणारी पुस्तके वेगवेगळी ठेवली जातात. यंदा सहावीच्या नवीन पुस्तकाची छपाई करण्यात आली असून ही पुस्तक बाजारात दाखल झाली आहेत.सुनील मगर म्हणाले, ‘‘पुणे, नाशिक, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व गोरेगाव हे बालभारतीचे आठ विभाग आहेत. या विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचे वितरण केले जाते. जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये पुस्तकाचे वितरण होते. गुरुवारपासून (दि. १२) पुस्तकांच्या वितरणास सुरुवात झाली. बालभारतीमधील सुमारे २० टक्के पुस्तकांचे वितरण झाले आहे.