ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबईसह दहा महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यंदा मतदानात तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाल्याने वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार याचीच उत्सुकता आहे. एकाबाजूला उमेदवारांची धाकधूक वाढली आहे तर, दुस-याबाजूला गल्लीबोळात, नाक्यांवर जय-पराजयाचे अंदाज वर्तवले जात आहेत. एकूण 2 हजार 275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एकूण 91 लाख 80 हजार 491 मतदारांपैकी 50 लाख 97 हजार 565 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी केंद्रांजवळ मोबाइल बंदी
यंत्रणा सज्ज
मतमोजणीसाठी प्रत्यक्षपणे 966 कर्मचारी लागणार असून 23 निवडणूक निर्णय अधिकारी व 23 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच यासंबंधीची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी साधारणत: 138 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
कुर्ल्याचा पहिला तर अंधेरीचा निकाल शेवटी
कुर्ला पश्चिम येथे सर्वांत कमी 10 टेबल आहेत. याठिकाणी 8 वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कुर्ल्याचा निकाल पहिला घोषित होऊ शकतो. अंधेरी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक 91 टेबल असून, त्याठिकाणी 13 वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अंधेरीतील निकाल सगळ्यात उशिरा घोषित होणार आहे.
#FLASH Counting of votes for 227 wards of BMC begins #Mumbaipic.twitter.com/aZamRcnaYa— ANI (@ANI_news) February 23, 2017