शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

बाजार समित्यांमधील व्यवहार कोलमडले

By admin | Published: June 03, 2017 4:07 AM

शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे

नामदेव मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत. बहुतांश ठिकाणचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शुक्रवारी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्येच समाधानकारक आवकची नोंद झाली असून, पूर्ण राज्यात २० हजार टन मालाचीच नोंद झाली आहे. एकूण आवकमधील ७ हजार टन आवक फक्त मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे. कृषी मालाला योग्य भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाची तंतोतंत अंमलबजावणी व कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा संपावर जाताच, पूर्ण राज्यात हाहाकार सुरू झाला आहे. १२ कोटी नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबई, पुणेसह सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कृषी मालाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपबाजार आवारांमधील सर्व व्यवहार कोलमडले आहेत. ८० टक्के बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, उर्वरित ठिकाणी आवक प्रचंड घटली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १० ते १५ हजार टन मालाची आवक होत असते. शुक्रवारी फक्त ७,२४५ टन मालाचीच आवक झाली आहे. यामध्ये कांद्याची आवक झालीच नाही. भाजीपाल्याची आवक ७० टक्के घटली आहे. मसाला व धान्य मार्केटमधील बहुतांश आवक परराज्यातून होत असल्याने, राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमधील आवक जास्त दिसत आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी ३०५पैकी जेमतेम ५५ बाजार समित्यांमध्ये समाधानकारक आवक झाली आहे. पूर्ण राज्यभर फक्त २०,८८९ टन मालाची आवक झाली आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये आवक झाली, त्यामध्येही भात, गहू, ज्वारी व इतर वस्तूंचा समावेश आहे. भाजीपाला, कांदा व इतर जीवनावश्यक व नाशिवंत वस्तूंची आवकच झालेली नाही. आंदोलन सुरूच राहिले, तर राज्यातील नागरिकांना शनिवारपासून भाजीपाला मिळणार नाही व डाळी व कडधान्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांची ताकदराज्यातील शेतकरी संघटित झाला तर काय करू शकतो, हे शेतकरी संपामुळे दोन दिवसांमध्ये पूर्ण राज्याला समजले आहे. शेतकऱ्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली असून, शासनाने आता तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र होऊन राज्यभर अन्नटंचाई सुरू होईल, असे एपीएमसीमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.