पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली.सुरेशदादा जैन यांनी ९ मे २००३ रोजी पत्रकार परिषद घेऊन, अण्णांवर आरोप केले होते. त्यावर हजारे यांनी अॅड़ हर्षद निंबाळकर व अॅड़ मिलिंद पवार यांच्यामार्फत २००३मध्ये पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खासगी खटला दाखल केला होता. हजारे यांच्या वतीने अॅड़ निंबाळकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल एस़ बांगड यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला मागे घेण्याच्या परवानगीचा अर्ज केला होता.धावपळ न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला जैन यांनीदेखील आपल्या विरोधातील जळगाव न्यायालयातील बदनामीचा खटला मागे घेतला आहे़ सध्या आपले वय ७८ वर्षे असून, वयोमानपरत्वे अधिक प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे़ त्यामुळे आपण हा खटला काढून घेण्याचा निर्णय घेतला, असे हजारे यांनी म्हटले आहे.घरकूल घोटाळ्यातील आरोपांमुळे सुरेशदादा जैन हे गेली ३ वर्षे कारागृहामध्ये आहेत़ सध्या ते आजारी असल्याचे कळते़ शिवाय, त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने विचार करता, हा बदनामीचा खटला पुढे चालविणे योग्य वाटत नाही़ जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही़- अण्णा हजारे
जैन यांच्याविरुद्धचा खटला मागे
By admin | Published: May 06, 2016 5:32 AM