ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. : रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे गेल्या१० दिवसांपासून आजाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले आहे. सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य झाल्याने उपोषण स्थगितकरत असल्याचे रायगड जिल्हा विक्रम-मिनिडोर चालक-मालक संघाने यावेळी जाहीर केले.
रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा परवान्यावरील बदली वाहन म्हणून चारचाकी वाहनास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र बदली वाहनाची इंजिनक्षमता ९८० सीसी ऐवजी ७०० सीसी इतकी शिथील करावी, ही रिक्षा चालक व मालकांची प्रमुख मागणी होती. ती मान्य करत यासंदर्भात पुढील आठवड्यात परिपत्रक काढण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे संघाने सांगितले.
आॅटोरिक्षा चालक व मालकांचे प्रश्न शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाकडू हे आश्वासन मिळाल्याचे संघाने स्पष्ट केले. परवान्याशिवाय मुंबई व ठाणे शहरांच्या तुलनेत विकासात मागास असलेल्यारायगड जिल्ह्याला एमएमआरटीए कार्यक्षेत्रातून वगळण्याची मागणी संघाने केली होती. त्यासंदर्भात सविस्तर विचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. शिवाय लवकरच यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा घडवून रायगड जिल्ह्याला एमएमआरटीए कार्यक्षेत्रातून वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असेही प्रशासनाने सांगितल्याचा दावा चालक-मालक संघटनेने केलाआहे.