शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

धक्कादायक! पुण्यात शासनाने विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जनापासून रोखले, सोबत जोडले हिंदू जनजागृती समितीचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 3:36 PM

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी. सुधारणावादी उपक्रम बंद करून जुन्या रिती सुरु ठेवण्याचे आदेश काढणे अशा घटनांमुळे आपली अश्मयुगाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.

पुणे, दि. 9 - महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचे पत्रही जोडले आहे. 

सोवळं प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल होणे, त्यापाठोपाठ सुधारणावादी उपक्रम बंद करून जुन्या रिती सुरु ठेवण्याचे आदेश काढणे अशा घटनांमुळे आपली अश्मयुगाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.

हिंदू जनजागृती समितीने उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ ऑगस्ट रोजी एक पत्र दिले दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी अशी मागणी केली होती. 

त्यावर सह संचालकांनी लगेच कृती करीत महाविद्यालयांनी या पत्रानुसार योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सह संचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विधार्थी यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये असे निर्देश सर्व महाविद्याल्याना दिले आहेत. 

अंनिसच्या पर्यावरण पूरक विसर्जन मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत तत्कालिन आघाडी सरकारने हा कार्यक्रम महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता. उच्च शिक्षण विभागाने हिंदू जनजागृती समितीची मागणी मान्य करून त्याला हरताळ फसला आहे.सोवळं प्रकरणी गुन्हा दाखल होण, पर्यावरण पूरक विसर्जनाला तिलांजली देणं अशा घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. त्यानंतर धर्माचा आधार आहे म्हणून शासनाने सती प्रथा सुरू करावी व पुन्हा अश्मयुगाकडे वाटचाल करावी अशी प्रतिक्रिया अंनिसचे प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे