लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कमिशन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती फेडरेशन आॅफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्सने (फामपेडा) दिली. यामुळे यासंदर्भातील ठोस निर्णय होईपर्यंत राज्यातील पेट्रोल पंपावरील सर्व व्यवहार सुरू राहतील. मागण्यांसाठी पंप चालकांनी १० मे रोजी पेट्रोल खरेदी करण्यास नकार दिला. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी रविवारपासून पेट्रोलपंप बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर सरकारने अनेक मुद्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. पुण्यामध्ये अन्न व नागरीपुरवठामंत्री गिरीश बापट यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या कमीशनवाढीसंबधी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन बापट यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
पेट्रोलपंपांचा ‘रविवारबंद’ मागे
By admin | Published: May 14, 2017 5:44 AM