शहरं
Join us  
Trending Stories
1
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
2
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
4
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
5
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
6
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
7
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
8
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
9
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
10
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
11
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
12
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
13
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
14
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
15
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
16
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
17
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
18
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
19
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
20
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 

अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:01 PM

Sana Malik vs Swara Bhaskar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपाचा विरोध असल्याने अजित पवारांनी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. सना यांनी आज अणुशक्तीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरताच सना यांनी अभिनेत्री स्वरा भास्करला जोरदार टोला लगावला आहे. 

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे. अणुशक्तीनगरमधून स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. यामुळे स्वरा भास्कर आणि सना मलिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

"नवीन मुलाला संधी! फहादला ही संधी दिल्याबद्दल शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे मॅम, अखिलेश यादवजी यांचे आभार. तो तुम्हाला निराश करणार नाही", असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटले होते. याला सना मलिक यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

सना यांनी म्हटले की, नवाब मलिक यांची मुलगी असल्याचा मला गर्व आहे. कोणत्याही अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी म्हणून अणुशक्तीनगरची मुलगी बनली तर कधीही चांगले, असे प्रत्त्यूत्तर सना यांनी दिले आहे. नवाब मलिक यांनी या भागात काम केलेले आहे. मला रॅलीमध्ये जे समर्थन मिळाले आहे ते त्याचे प्रमाण आहे, असे त्या म्हणाल्या. 

शरद पवार गटाने पॅराशूट लावून लँड झालेल्या उमेदवाराला माझ्याविरोधात उतरविले आहे. हे राजकारण आहे, कोणतीही दुश्मनी नाही. सध्या ते विरोधात आहेत. यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही, असे सना यांनी स्पष्ट केले. हे लोक मला नवाब मलिक यांचीच मुलगी म्हणून ओळखत नाहीत, तर मी या लोकांच्या घरी जाते, चहा पिते, त्यांच्या समस्या जाणते, असे सना यांनी सांगितले.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSwara Bhaskarस्वरा भास्करanushakti-nagar-acअणुशक्ती नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४