बेळगाव : कर्नाटकातीलबेळगाव जिल्ह्यातील कागवाड, गोकाक आणि अथणी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.या तिन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.कर्नाटकातील आमदारांच्या राजीनामानाट्यानंतर ५ डिसेंबर रोजी १५ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घेण्यात आली. भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे कर्नाटकात सध्या सरकार आहे.या पोटनिवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील कागवाड, गोकाक आणि अथणी विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आलेल्या निकालानुसार कागवाड मतदारसंघात श्रीमंत पाटील, गोकाक मतदारसंघात रमेश जारकीहोळी आणि अथणी मतदारसंघात महेश कुमठहळळी यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत.कागवाड मतदारसंघात ११ व्या फेरीअखेर भाजपचे श्रीमंत पाटील यांनी १४ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ५९८८२ मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार राजू कागे यांना ३६२९१ मते मिळाली आहेत.अथणी मतदारसंघात भाजपच्या महेश कुमठहळ्ळी यांनी ११ हजारांची आघाडी घेतली आहे. त्यांना २३0४१ तर काँग्रेसचे गजानन मंगसुळी यांना १२,२४४ मते मिळाली आहेत.गोकाक मतदारसंघातून भाजपच्या रमेश जारकीहोळी यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. नवव्या फेरीअखेर त्यांनी १३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. जारकीहोळी यांना ३७५६४ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लखन जारकीहोळी यांना २४९0५ तर निधर्मी जनता दलाचे अशोक पुजारी यांना १४0१५ मते मिळाली आहेत.अथणी तालुक्यातील कागवाड येथून माजी आमदार राजू कागे यांना भाजपने तिकिट नाकारल्याने ते काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. पक्षांतर केलेले श्रीमंत पाटील यांना येथून भाजपने तिकिट दिले आहे.अथणी मतदारसंघात भाजपने महेश कुमठहळ्ळी यांना तिकिट दिले असून काँग्रेसकडून गजानन मंगसुळी रिंगणात आहेत.गोकाकमधून रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसचा राजीनामा देउन भाजपकडून तिकिट मिळविले. त्यांच्या विरोधात त्यांचेच धाकटे बंधू लखन यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याशिवाय निधर्मी जनता दलाचे अशोक पुजारी हेही या मतदारसंघातून निवडणुक लढवित आहेत.
कागवाड :
- श्रीमंत पाटील-भाजप-५0८८२
- राजू कागे -काँग्रेस-३६२९१
अथणी
- भाजप :महेश कुमठहळळी २३0४१
- काँग्रेस : गजानन मंगसूळी १२,२४४
गोकाक
- भाजप : रमेश जारकीहोळी-३७५६४
- काँग्रेस : लखन जारकीहोळी -२४९0५
- निधर्मी जनता दल : अशोक पुजारी १४0१५