ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. ५ - कर्नाटकमधील बेळगावात मराठी नागरिकांची गळचेपी अद्याप सुरू आहे. कर्नाटक दिनाच्या दिवशीच बेळगावात काळा दिवस आयोजित करत शहरात एक फेरी काढण्यात आली. त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर सहभागी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आणि कन्नड संघटनांनी महापौर आणि उपमहापौरांची केबिन व नामफलकाला याच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांच्या केबिनलाही काळं काळं फासलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी ४ कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच कर्नाटकच्या नगरविकासखात्याने महापौरांना नोटीस बजावत बेळगाव नगरपालिका बरखास्त करण्याचा इशाराही दिला.
या सर्व घटनेचे पडसाद कोल्हापूरमध्येही उमटले असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकमधून येणारी वाहनं रोखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.