शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शासन निधीत अडकली नाट्य संमेलनाची ‘घंटा’

By admin | Published: February 02, 2016 1:18 AM

नाट्यसंस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, याकरिता नाट्य संमेलनाची ‘घंटा’ दरवर्षी शासनभरोसे वाजवली जाते. यंदा दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या ‘नाट्यात’ याच ‘घंटे’चे भवितव्य अडकले आहे

पुणे : नाट्यसंस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, याकरिता नाट्य संमेलनाची ‘घंटा’ दरवर्षी शासनभरोसे वाजवली जाते. यंदा दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या ‘नाट्यात’ याच ‘घंटे’चे भवितव्य अडकले आहे. संमेलन अवघे पंधरा दिवसांवर आले तरी सरकारकडून २५ लाख रुपयांचा निधी अद्याप नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला मिळालेला नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. संमेलनाचा निधी दसऱ्याच्या मुहूर्तावर संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होईल, अशी सांस्कृतिकमंत्र्यांची घोषणा अद्यापतरी केवळ घोषणाच ठरली आहे. येत्या १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. जेमतेम पंधरा दिवसांचा कालावधी असतानाही नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निधीसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. साहित्य संंमेलनासाठी साहित्य महामंडळाला वेळेपूर्वीच निधी मिळतो, मग नाट्य संमेलनाला ही सापत्न वागणूक का? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेना आणि भाजपा दोघेही सत्तेत असले तरी दोघांमधून विस्तवही जात नसल्याची सध्याची स्थिती आहे. यातच शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याने संमेलनावर शिवसेनेचा प्रभाव राहणार असल्याने भाजपाने निधीसाठी जाणीवपूर्वक आयोजकांना काहीसे ‘वेठीस’ धरल्याचा सूर कानावर पडत आहे. या दोघांच्या भांडणाचा फटका नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बसत आहे. राज्य शासनातर्फे साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनासाठी दर वर्षी २५ लाख रुपये दिले जातात. पूर्वी हा निधी केव्हा मिळेल याची खात्री नव्हती. निधीसाठी पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात वारंवार खेटे घालावे लागत. साहित्य महामंडळ व नाट्य परिषदेकडून लेखी स्वरूपात प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबतीत निर्णय होत. यामध्ये संमेलनाच्या तारखा जवळ आल्या तरी प्रत्यक्ष निधी मिळत नसे. मात्र, सरकार बदलल्यानंतर घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी निधी दसऱ्याच्या आधी मिळेल, अशी घोषणा करून आयोजकांना दिलासा दिला होता. त्यानुसार विनोद तावडे यांनी आपली घोषणा खरी करून दाखवली पण नाट्य संमेलनाच्या पदरी काहीशी उपेक्षाच आली आहे. (प्रतिनिधी)