शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

लाभार्थी निवाऱ्याच्या प्रतीक्षेत

By admin | Published: April 04, 2015 4:23 AM

समाजकल्याण खात्याच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील गोंधळ सर्वश्रुत आहे. मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेची गतही यापेक्षा वेगळी नाही.

शोभना कांबळे , रत्नागिरीसमाजकल्याण खात्याच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील गोंधळ सर्वश्रुत आहे. मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेची गतही यापेक्षा वेगळी नाही. निधीअभावी या योजनेअंतर्गत राज्यातील ६७६ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना फटका बसला आहे. तब्बल १६ हजार ३२७ लाभार्थ्यांची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत, तर १६५१ घरांचे बांधकाम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे १७ हजार ९७८ लाभार्थी अजून प्रतीक्षेतच आहेत. परिणामी तब्बल १५ वर्ष$ांत निर्धारित लोकांपैकी ५0 टक्के लोकांचे स्वत:च्या घरांचे स्वप्न अधुरेच राहिलेले आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय घटकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे १९९८ साली ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत मोफत जागेबरोबरच बांधकाम खर्चाच्या मर्यादेत ३० टक्के शासकीय अनुदान देण्यात येते. तर उर्वरित रक्कम उभी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, शासनमान्य वित्तीय संस्था, सहकारी बँका यांच्याकडून कर्ज घेऊन बांधकामे पूर्ण करण्याची तरतूद यात होती. मात्र, शासनाने पात्र ठरवलेल्या अल्पउत्पन्न लाभार्थ्यांना विविध बँकांनी मात्र अपात्र ठरविले. त्यामुळे गेली १५ वर्षे राज्यातील ६७६ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांंमधील १८,००० घरे अपूर्णावस्थेत आहेत.महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेने २00१ मध्ये याप्रकरणी तत्कालीन समाजकल्याणमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यामुळे २६ मार्च २००२ रोजी सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व क्रीडा व विशेष सहाय विभागाने मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत अपूर्ण असलेली घरे पूर्ण करणे आवश्यक असल्याचा शासनादेश काढण्यात आला. एवढे होऊनही ६७६ गृहनिर्माण संस्थेतील १८,००० घरे पूर्ण झालेली नाहीत.