शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

मराठवाड्यात बरसला; बाप्पा पावला!

By admin | Published: September 15, 2016 3:56 AM

घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायांना निरोप देण्याची वेळ आली असतानाच तहानलेल्या मराठवाड्यात बुधवारी सर्वदूर परतीचा जोरदार पाऊस झाला.

पुणे/औरंगाबाद : घरोघरी विराजमान झालेल्या श्री गणरायांना निरोप देण्याची वेळ आली असतानाच तहानलेल्या मराठवाड्यात बुधवारी सर्वदूर परतीचा जोरदार पाऊस झाला. जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाल्याने जणू बाप्पाच पावल्याचा आनंद बळीराजाला झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे़ मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत बुधवारी दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील पाचही मंडळांत आणि लोहारा तालुक्यातील माकणी मंडळात अतिवृष्टी झाली़ औरंगाबादेतील पैठण, वैजापूरसह नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पाऊस झाला. मसलगा परिसरातील पिके पाण्याखाली गेली असून काही घरांना भेगा पडल्या आहेत़ लातूर शहरानजीक असलेल्या साई व नागझरी बॅरेजेसमध्ये १० से़मी़ ने वाढ झाली आहे़ पाणीपातळी ३़४५ मीटरवर आली आहे़ मांजरा प्रकल्पातील पाण्याची पातळी ४ से़ मी़ ने वाढली आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यात तब्बल ९१ मि.मी. पावसाची नोंद झाली़ लोहारा तालुक्यातील माकणी मंडळातही अतिवृष्टी झाली़ नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस बरसत आहे. बुधवारी दुपारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले़ गोदा पात्रात पाण्याचा येवा वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. परभणी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पहाटे जोरदार पाऊस झाला. पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यांत एक ते दीड तास हा पाऊस बरसला. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ५६़२ मि.मी. पाऊस झाला. पालम शहरपासून अर्धा किमी अंतरावरील लेंडी नदीला पूर आला होता़ त्यामुळे आरखेड, फळा, घोडा, उमरथडी, सायाळा या गावातील ग्रामस्थांचा पालम शहराशी संपर्क तुटला होता़ हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत परिसरातही पावसाचा जोर होता. बीड जिल्ह्यातील आकरा पैकी दहा तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)गणरायाच्या निरोपाला पाऊसही येणारराज्यात गुरुवारी भव्य मिरवणुकांनी गणरायाचे विसर्जन होत असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़