ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 05 - परिवहन तूट वसुली बंद करण्यात येणार असल्याने आधीच संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ मात्र पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने तिकिटांच्या दरामध्ये वाढ करण्यास शिवसेना- भाजपा युतीने यावर्षी टाळले आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र दिवाळीतील सानुग्रह अुनदानावर पाणी सोडावे लागणार आहे़बेस्ट उपक्रमाचा सन २०१७-२०१८ चा अर्थसंकल्प बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांना आज बेस्ट भवनमध्ये सादर केला़ आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमात ५६५़७४ कोटी रुपये तूट या अर्थसंकल्पातून दर्शविण्यात आली आहे़ तर भांडवली खर्चाकरिता २४६़५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़मेट्रो, मोनो, शेअर रिक्षा-टॅक्सीमुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये प्रचंड घट झाली आहे़ याचा परिणाम उत्पन्नाला बसला असल्याने गेल्या दीड वर्षांत बेस्टने तीनवेळा भाडेवाढ केली़ मात्र पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असून बेस्ट समिती भाजपाच्या ताब्यात आहे़ ऐन निवडणुकीच्या काळात भाडेवाढ करुन भाजपाला नागरिकांचा रोष ओढावून घ्यायचा नाही़ त्यामुळे प्रवाशांना यावेळीस दिलासा देण्यात आला आहे़ वेतनावरील खर्च वाढलाकोणत्याही प्राधिकरणाचा उत्पन्नाचा सर्वाधिक टक्का हा आस्थापनावर खर्च होत असतो़ बेस्ट उपक्रमात ४४ हजार कर्मचारी-अधिकारी आहेत़ त्यांच्या वेतनावर आतापर्यंत ७० ते ८० कोटी खर्च होत होते़ यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ होऊन १२५ कोटींवर हा खर्च पोहोचला आहे़सानुग्रह अनुदान नाहीदिवाळीमध्ये दरवर्षी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रथा आहे़ मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्थसंकल्पात बेस्टने या अनुदानाची तरतूद केलेली नाही़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना यावर्षी सानुग्रह अनुदान मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत़टीडीएलआरमुळे वाढली तूटपरिवहन तूट वसुली म्हणजेच टीडीएलआर गेल्या काही वर्षांपासून शहर भागातील बेस्टच्या वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे़ या वसुलीतूनच बेस्ट उपक्रम आपल्या परिवहन खात्याची तूट काही प्रमाणात भरुन काढत होते़ मात्र यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे़ तसेच हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले़ त्यानुसार ही तूट वसुली आता बंद करण्यात येणार आहे़ त्यामुळे बेस्टची आर्थिक बाजू आणखी कमकुवत झाली आहे़अशा काही नवीन योजनाआगीपासून उपकेंद्रांचे संरक्षणबेस्टच्या दक्षिण मुंबईतील जुन्या उपकेंद्रांमध्ये आग लागण्याचा धोका संभावतो़ त्यामुळे बॅकबे, नरिमन पॉर्इंट, खेतवाडी आणि डॉ़ बी़ए़ मार्ग येथील उपकेंद्रांमध्ये ११० के़व्ही़ केबलच्या संरक्षणाकरिता संपूर्ण स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहे़ या यंत्रणेमुळे तळघरातील आणि वरील मजल्यावरील जीआयएस टर्मिनेशमधील तारखंडांवरील आग विझविण्याकरिता यापद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापरु होऊ शकेल़बस आगारांचा विकासबेस्टचे २७ बस आगारांच्या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने त्या धोकादायक झाल्या आहेत़ त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकरिता मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने बस आगारांचे पुर्नविकास करण्याची गरज अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आली आहे़ मात्र एका बस आगाराच्या विकासासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ तीन वर्षांमध्ये आगाराचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे़ यासाठी पहिल्या वर्षात २० कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४० आणि तिसऱ्या वर्षात ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़कर्मचाऱ्यांवर टांगती तलवारबेस्ट उपक्रमामध्ये ३८६६ बसगाड्यांचा ताफा आहे़ तर ५०६ बसमार्ग आणि २७ बस आगार आहेत़ बेस्ट उपक्रम यामध्ये सुधारणा करणार आहे़ मात्र ही सुधारणा करताना बऱ्याच ठिकाणी मॅन्युअल काम बंद करुन संगणकीकृत करण्यात येणार आहे़ बेस्ट उपक्रम आधीच तोट्यात असल्याने कर्मचारी संख्या कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही़महापालिकेकडे अनुदान मागणारबस मार्गांमध्ये बदल, बस फेऱ्या आणि बसगाड्यांचे नियंत्रण यासाठी एकात्मिक उपाययोजना पालिका करणार आहे़ याकरिता सल्लागार नेमण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांची गरज आहे़बस आगार विकास आणि एकात्मिक योजनेसाठी आवश्यक १२५ कोटी रुपयांची देण्याची मागणी बेस्ट महापालिकेकडे करणार आहे़ई प्रसाधनगृहेबेस्टचे २०० बस टर्मिनल आहेत़ बसस्थानके, बस चौक्या आणि रोख भरणा केंद्र येथे प्रवाशी व वीजग्राहक, कर्मचारी आणि महिलांसाठी ई प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत़आकडेवारी कोटीमध्येविद्युत पुरवठा विभाग नफ्यातउत्पन्न४२३२़११खर्च३७७१़३२नफा४६०़७९परिवहन विभागउत्पन्न १७५३़७३खर्च२७८०़२६तूट१०२६़५३संपूर्णउपक्रमउत्पन्न ५१८५़०४खर्च६५५१़५८तूट५६५़७४
मुंबई महापालिका निवडणुकीमुळे टळली बेस्ट भाडेवाढ
By admin | Published: October 05, 2016 5:54 PM