मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. काेरोनाचे संकट असल्याने यावर्षीही रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करून साजरा करावा. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना करतो व सर्वांना, विशेषतः मुस्लिम भगिनी-बंधूंना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले.
रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी - हेमंत नगराळेकोरोनाच्या वाढत्या संकटामुळे मुस्लिम बांधवांनी आज (शुक्रवारी) घरी राहूनच रमजान ईद साजरी करावी, असे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. काेराेनाविराेधातील लढ्यात आतापर्यंत सर्वांनीच सहकार्य केले, पुढेही कराल अशी खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असे सांगत त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.