शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

सावधान...वाहन नियम मोडल्यास दहापट अधिक दंड

By admin | Published: April 02, 2017 6:11 AM

अपघात मोबदल्यात वाढ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडात केलेली वाढ असे काही महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - मोटार वाहन कायद्याच्या कलम 118 नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे . त्यानुसार दिनांक 1 जुलै 1989 पासून रुल्स ऑफ रोड रेगुलेशन लागू करण्यात आलेले आहेत . केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटार वाहन कायदा 2016च्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. भारतातील मोटार वाहन प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्यास हे विधेयक उपयुक्त ठरणार आहे. या विधेयकात अपघात मोबदल्यात वाढ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या दंडात केलेली वाढ असे काही महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.दरवर्षी भारतात 5 लाख अपघात होतात तर दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. रस्ते अपघातांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये प्रतिवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा बळी जातो. केंद्र सरकारच्या या नव्या नियमामुळे अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी होणार असून, दुसरीकडे सरकारच्या महसुलात मात्र प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे.या नवीन विधेयाकांतर्गत आता हिट अँड रन केस मध्ये मिळणारा अपघात मोबदला 25 हजारांवरून 2 लाख रुपये करण्यात आला आहे. तसेच वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढविणे, वाहनांची नोंदणी यांसारखी महत्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत. तसेच अल्पवयीन मुलांनी जर मोटार वाहन कायदे मोडले तर त्यांच्या पालकांना याबाबत दोषी ठरविण्यात येणार आहे. तसेच 3 वर्षे तुरुंगवास आणि 25,000 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे परवाना रद्द करण्यात येईलआकारल्या जाणाऱ्या दंडांतसुद्धा बदल करण्यात आले असून आता कमीतकमी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना गाडीची आणि चालकाची कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार दिले आहेत.नव्या विधेयकामध्ये 28 सुधारित कलमांचा समावेश करण्यात आला आहे. रस्ते दुर्घटनांना मोठय़ा प्रमाणात आळा घालण्याच्या दृष्टीने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून, केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी हा एक निर्णय असल्याचे सांगितले जात आहेत. या नियमांतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, रस्ते अपघातात बळी जाणाऱयांच्या संख्येतही घट होणार आहे.विनाहेल्मेट दुचाकीस्वारांनाही फटका -केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या नव्या विधेयकानुसार, वाहन चालविताना वाहनाचा विमा उतरविण्यात आला नसल्यास दोन हजार दंड अथवा तीन महिन्यांची कैद अशा शिक्षेची तरतूद आहे. तर विनापरवाना गाडी चालविताना आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम पाचशे रुपये होती. दारु पिऊन वाहन चालविताना आढळल्यास तब्बल दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना होणाऱया अपघातात मोठी घट होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱयांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यासह तीन महिन्यासाठी वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.हिट अँड रनला बसणार आळा - केंद्र सरकारचा ह्यमोटार वाहन कायदा, 2016 देशभरात लागू झाल्यानंतर अल्पवयीन मुलांना वाहन चालविताना पकडल्यास त्यांच्या पालकांना याप्रकरणी दोषी ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहनाची नोंदणीही रद्द करण्याचा बडगा उगारण्यात येणार आहे. तसेच, दिवसेंदिवस वाढत असलेल्या हिट अँड रन प्रकरणी जखमी झालेल्या व्यक्तींना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पूर्वी ही रक्कम केवळ 25 हजार रुपये होती. मात्र, याबाबत एखाद्या प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दहा लाख रुपयांची रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे.- 177 ए हा नवा नियम लागू करण्यात आला. रस्ता नियम उल्लंघन केल्यास. 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. - रस्त्याच्या कायद्याचे नियम तोडल्यास 100 रुपये ठोठावण्यात येणारा दंड आता 500 रुपये करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्यात अपयशी चालक (पिवळ्या रेषेच्या लाल प्रकाशाचे उल्लंघन, संकेत न देता मार्गिका बदलणे, इ) - विनापरवाना (लायसन्स) वाहन वापरल्यास किंवा विनापरवाना वाहन चालवल्यास पाच हजार रुपये - वाहन कायदा 178 नुसार विनातिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी 200 रुपये आकरले जात होते. - दारू पिऊन वाहन चालवल्यास दहा हजार रुपये- मर्यादेबाहेर मालवाहतूक केल्यास 20 हजार- मर्यादेबाहेर प्रवासी घेतल्यास प्रतिप्रवासी एक हजार- सीटबेल्ट न लावल्यास एक हजार- हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये असा दंड आकारला जाईल. - हेल्मेट न घातल्यास तीन महिन्यांपर्यंत परवाना स्थगितही केला जाईल. - विनापरवाना गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. - मोटार वाहन अधिनियमांतर्गत जेव्हा वाहनचालक किंवा वाहक आरोपी ठरतात आणि पोलीस अधिकाऱ्याने वाहनाच्या मालकाला विचारले असता चालक आणि वाहकाचे नाव, पत्ता आणि अनुज्ञप्तीची माहिती देण्यास असफल ठरले असता 2000 रुपये दंड आकारण्यात येईल. - अपात्र व्यक्तीने वाहन चालविणे किंवा - वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणे किंवा --- पूर्वी जप्त केलेल्या वाहनचालक अनुज्ञप्तीमधील शेरे उघड न करता अनुज्ञप्तीची मागणी पाच हजार रुपये - जास्त गतीने वाहन चालविणे - 1000 ते 2000 रुपये दंड - धोकादायक वाहन चालवणे - पाच हजार रुपयापेक्षा अधिक दंड - रेसिंग आणि गती चाचण्या - 5000 रुपये दंड- स्वत: व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्ती वाहून नेणारा दुचाकी / मोटर सायकलस्वार (तीन व्यक्ती एका दुचाकीवर) 2000 रुपये आणि परवाना 3 महिन्यासाठी अपात्र - सिट बेल्ट नसल्यास - 1000- एखाद्या मोटार वाहनात अथवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रस्ते सुरक्षा, ध्वनी नियंत्रण आणि वायू प्रदूषणासंदर्भातील विहित मानकांचे उल्लंघन करणारी, वाहनचालक अथवा वाहन चालविण्याची परवानगी देणारी कोणतीही व्यक्ती (वाहनात बिघडलेला सायलेन्सर बसविणे इ.) - 1000 ते 5000 रुपये पर्यंत दंड