बुलडाणा : शहरापासून जवळच असलेल्या देऊळघाट येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेवर दोन भाडोत्री शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या ‘स्टिंग आपॅरेशन’ द्वारे उघडकीस आले़ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.नबाबनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास एक हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत असून, सध्या शाळेचे मुख्याध्यापक पद प्रभारी आहे. येथील एक शिक्षिका प्रसुती रजेवर गेली आहे. सामाजिक शास्त्र व कला हे दोन विषय शिकविण्यासाठी मढ येथून एक शिक्षक शाळेत येत असतो. त्याची या शाळेवर अधिकृत नियुक्ती केलेली नाही, हे विशेष. प्रसुती रजेवर गेलेल्या शिक्षिकेच्या जागेवर आणखी एका विज्ञान पदवीधराची नियुक्ती अशाच पद्धतीने करण्यात आली आहे. लोकमत चमूने या शाळेला भेट दिली असता, सदर शिक्षक इयत्ता दहावी (अ) च्या वर्गावर शिकवताना आढळला. लोकमत चमूने कॅमेरा बाहेर काढताच या शिक्षकाने वर्गाबाहेर पडण्याची तयारी केली; त्यांना थांबण्याची विनंती केल्यानंतर तो काही क्षण थांबला; मात्र नंतर लगेच तो वर्गाबाहेर गेला. या शिक्षकाचे नाव काय, शिक्षण किती, तो कधीपासून शाळेवर काम करीत आहे, आदी प्रश्नांवर शाळेवरील एकाही शिक्षकाने उत्तरे दिली नाही. दूसरा शिक्षक आज हजर नव्हता; मात्र तेसुद्धा खास विज्ञान विषय शिकविण्यासाठी आयात केल्याची माहिती सुत्रांनी दिली. या शिक्षकाबाबत शाळा व्यवस्थापन समितीकडे विचारणा केली असता कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही.सहीसाठी वेगळे मस्टरदेऊळघाट जिल्हा परिषद शाळेवर भाडोत्री शिक्षकांसाठी सही करण्याकरीता वेगळे मस्टर तयार करण्यात आले असून, त्याची नोंद मुख्याध्यापक स्वत: ठेवतात अशी माहिती मिळाली. शाळा व्यवस्थापन समितीचा ठरावच्एखादी शिक्षिका मातृत्व रजेवर गेली असेल किंवा एखादा शिक्षक दीर्घ रजेवर गेला असेल, तर त्याच्या जागेवर स्वयंप्रेरणेने शिकविणारा कोणताही शिक्षक नेमण्याचा नियम नाही. शालेय व्यवस्थापन समितीने तसा ठराव घेऊन, एखाद्या शिक्षकाची नेमणूक केली तरी त्याला जिल्हा परिषद प्रशासनाची मान्यता हवी असते. च्देऊळघाटच्या शाळेवरील शिक्षिका प्रणिता पाटील या प्रसुती रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर विज्ञान विषय शिकविण्यासाठी नेमलेला शिक्षक हा शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावावरून नेमल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक वायाळ यांनी दिली. च्हा ठराव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या ठरावाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही.अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी सदर शिक्षक हा अपंग समावेशीत शिक्षक म्हणून वाशिम येथील आसरा माता शिक्षण संस्थेकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. दूसरा शिक्षक हा स्वयंप्रेरणेतून शिक्षणाचे काम करीत आहे. ते यापूर्वी अंशकालीन शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.- डी.डी.वायाळ, प्रभारी मुख्याध्यापक, जि.प.हायस्कूल, देऊळघाटअपंग समावेशीत शिक्षक म्हणून सध्या कुणीच कार्यरत नाही. स्वयंप्रेरणेतून कुणी काम करत असेल, तर त्याबाबत नियम तपासून पाहावे लागतील. कुठेही भाडोत्री शिक्षक नेमला जात असेल किंवा नियमबा' काम होत असतील, तर चौकशी करून संबधितांवर कारवाई केली जाईल. देऊळघाटच्या शाळेसंदर्भात माहिती घेतल्यानंतरच बोलता येईल.- वैशाली ठग, शिक्षणाधिकारी बुलडाणासन २००९-१० मध्ये अपंग समावेशित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र ती रद्द करण्यात आली आहे. वाशिम जिल्'ातून अशाप्रकारे कोणत्याही शिक्षकाला बुलडाण्यात पाठविल्याची माहिती नाही. संस्थांनीसुद्धा तशी कोणतीही माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेली नाही.- नितेश गवई, समन्वयक, सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद, वाशिम.
जिल्हा परिषद शाळेवर ‘भाडोत्री’ शिक्षक
By admin | Published: January 07, 2015 1:55 AM