शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

भैरप्पा, खरे यांची नाशिककरांना श्रवणपर्वणीं

By admin | Published: July 25, 2016 2:48 PM

नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज संध्याकाळी नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

सार्वजनिक वाचनालय : शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २५ - नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा व ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विष्णू खरे यांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सावानाने प्रथमच हा योग जुळवून आणला आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात डॉ. एस. एल. भैरप्पा ‘भारतीयत्व आणि भारतीय साहित्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर डॉ. विष्णू खरे हे ‘मी आणि माझी वाचनालये’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सावानाच्या वतीने रविवारपासून शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम सुरू आहेत.

रविवारी सकाळी डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी निमंत्रित मान्यवरांशी संवाद साधत आपला लेखनप्रवास उलगडून दाखवला. वयाच्या अकराव्या वर्षी आई गेली. त्यानंतर बहीण-भाऊ एकाच दिवशी प्लेगने मृत्यू पावले. पंधरा वर्षांचा असताना त्यांचे मृतदेह स्वत:च्या खांद्यावर वाहिले अन् मृत्यूविषयी चिंतन सुरू झाले. त्यातून तत्त्वज्ञानाकडे वळलो व लेखनाचा मार्ग सुकर झाला, असे ते म्हणाले. सन १९६२ मध्ये पीएच.डी. करीत असतानाच ‘वंश’ या विषयाने अस्वस्थ केले व कादंबरी आकार घेऊ लागली. भारतातील वंश संकल्पनेचा सखोल अभ्यास करून ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी लिहिली. त्यावर पुढे चित्रपटही आला. आपल्या या दुसऱ्या कादंबरीने आपल्याला कादंबरीकार म्हणून ओळख दिली; शिवाय आपल्यात बदलही घडवल्याचे डॉ. भैरप्पा म्हणाले. सायंकाळी डॉ. विष्णू खरे यांची मुलाखत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी घेतली. त्यात डॉ. खरे यांनी अनेक विषयांवर रोखठोक मते व्यक्त केली. आपल्याकडचे चेतन भगत वगैरेंसारख्या लेखकांचे साहित्य सुमार दर्जाचे आहे. ते जाळून टाकायला हवे; पण हीच पुस्तके आज बेस्ट सेलर ठरत आहेत. पाश्चात्त्य देशांत पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात. आपल्याकडे काही हजार पुस्तके विकली गेली तरी ती बेस्ट सेलर ठरतात. आर. के. नारायण यांच्यासारखे लेखक मात्र खरोखर कमिटेड होते, असे यावेळी डॉ. खरे म्हणाले.दरम्यान, आज सायंकाळी होणाऱ्या सोहळ्याला सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी आदि उपस्थित राहणार आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीची परंपरानाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या शंभराव्या वर्धापनदिनास स्वातंत्र्यवीर सावरकर, १२५व्या वर्धापनदिनाला यशवंतराव चव्हाण, तर १५० व्या वर्धापनदिनाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची उपस्थिती होती. त्याच परंपरेचे जतन करीत यंदाच्या १७५ व्या वर्धापनदिनाला डॉ. एस. एल. भैरप्पा व डॉ. विष्णू खरे या दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.