जयंत धुळप
सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या अलिबागेत अक्षय तृतिये पासुन मथुरेतील सुप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरातील श्रीकृष्ण स्तुती भजनाचा सुरेल नाद हार्मोनियम; ढोलकी आणि झांज यांच्या साथीने घुमू लागतो आणि अलिबागकरांची सकाळ भक्तीमय होवुन जाते.
मथुरेतील श्रीकृष्णमंदीरातील पंडीत संतोषलाल शर्मा (हार्मोनियम), प्रदिप शर्मा (ढोलकी) आणि गोपाल शर्मा (झांज) हे तिघे भल्या पहाटे पाच वाजता संपुर्ण शहरात चालत फिरुन "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..."हे भजन अत्यंत सुरेल आवाजात गात श्रीकृष्ण भक्ती जागर करतात; आणि संपुर्ण शहराचे वातावरण प्रसन्न करुन टाकतात. अलिबाग गुजराथी समाजाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या प्रथेस यंदा २० वर्ष पुर्ण होत आहेत.