सोलापूर : विख्यात अर्थतज्ज्ञ, राज्यसभेचे खासदार प्रा. भालचंद्र मुणगेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सोलापुरातील अश्विनी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत समारंभानिमित्त ते सोलापुरात होते. दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या प्रमुख भाषणाला सुरूवात झाल्यानंतर त्यांना अधूनमधून धाप लागत होती. कार्यक्र मानंतर ते कुलगुरूंच्या दालनात गेले. विद्यापीठात जेवण आटोपल्यानंतर ते कुलगुरूंसोबत होते. भाषणादरम्यान होत असलेला त्रास पुन्हा सुरू झाला. मुणगेकर यांच्या नाडीचे ठोके वाढले आणि धाप लागण्यास सुरूवात झाली़ प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच त्यांना तत्काळ सात रस्ता येथील अश्विनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवासामुळे त्यांच्यावर थोडा ताण आला असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी सांगितले
भालचंद्र मुणगेकर रूग्णालयात
By admin | Published: February 13, 2016 2:27 AM