ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - दोन वर्षांपूर्वी याच दिवशी शिवबंधनाला सुरुवात झाली, शिवसैनिकांनी जाहीरपणे मनगटावर शिवबंधन बांधले. तो फक्त गंडा-दोरा नाही ती तर जनतेबद्दलची वचनबद्धता आहे. मुंबईसह सर्व दहा महापालिकांध्ये महिनाभरात भगवा फडकणार आहे असा विश्वास शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 'जे बोलतो ते करुन दाखवतो' या टॅगलाईनखाली शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक चागंलीच रंगताना दिसतं आहे. युतीबबाबत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या मात्र, दोघांचे प्रस्ताव एकमेंकाना पसंत न पडल्यामुळे युती तुटण्याचे संकेत मिळत आहेत. दादरमध्ये उमेदवार घोषीत करुन शिवसेने स्वबळाची तयारी सुरु असल्याचे संकेत दिले होते. 23 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहुर्तू साधून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जे बोलतो ते करुन दाखवतो अशा टॅगलाईनसह वचननामा प्रकाशित केला आहे.
काय आहे सेनेचा वचननामा ?
जेनरीक अौषधांसाठी रूग्णालयात स्टोअर्स सुरू होणार.
बाळासाहेबांच्या नावाने आरोग्य कवच. आरोग्य सेवा आपल्या दारी योजना.पूर्व किना-यावर पर्यटनावर भर देणार. उद्याने, मैदाने उभारणारशिक्षण - ई वाचनालय उभारणार. कौशल्य विकास, महापालिका संगीत अकादमी उभारणारसुरक्षित सुंदर स्वच्छ मुंबईसाठी वचननामा. मालमत्ता करात सूट व सवलत.नव्या डीपीत आरेचे आरक्षण कायम ठेवणार, कोस्टल रोड उभारणार
500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूटआत्मरक्षण प्रशिक्षण केंद्रमहापालिकेच्या विद्यार्थ्यांना महापालिकेत नोकरीस प्राधान्यजेष्ठ विरंगुळा केंद्रआरे कॉलनीचं हरीतपट्टा आरक्षण कायम करणारखड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणारबेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवचशालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवासमुंबईतील डबेवाल्यांसाठी डबेवाला भवनरेल्वे २ हजार किमीच्या मुंबईतील रस्त्यांवर सातत्याने कामे सुरु असतात. मुंबईत अन्य ४५ संस्था सातत्याने रस्त्यावर खोदकाम करतात. त्यांच्यावर चाप लावण्याचे काम करणार.
महापालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना महापालिका नोकरीत प्राधान्य देणार.
महापालिकेच्या शिक्षक मन की बात करत नाहीत तर शिक्षणाची बात करतात. व यात फक्त एकतर्फी बात होत नाही.स्थानकाजवळ दुचाकी स्टँड उभारणार