जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याचा सन्मान म्हणून अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठ व रॉबर्ट बी. डोहर्टी वॉटर फॉर फूड इन्स्टिट्युटने तेथील संशोधन प्रकल्पाला ‘भंवरलाल हिरालाल जैन- वॉटर फॉर फूड कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम नेब्रास्का युनिव्हर्सिटी’ असे कायमस्वरूपी नाव दिले आहे.प्रकल्पाअंतर्गत सहभागी होणाऱ्या संशोधकांना ‘बी. एच. जैन स्कॉलर्स’ तर संशोधन पूर्ण करणाऱ्यांना ‘बी. एच. जैन फेलो’ म्हणून गौरवण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे.लिंकन, नेब्रास्का येथे सुरू असलेल्या ‘वॉटर फॉर फूड ग्लोबल कॉन्फरन्स’मध्ये नेब्रास्का विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. हॅन्क एम. बॉन्डस् यांनी ही घोषणा केली. जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना त्यांनी सन्मानपत्राच्या वाचनानंतर स्मृतिचिन्ह प्रदान केले. कृषि व जल व्यवस्थापनातील अमूल्य योगदानासह लोकोपकारी, गांधीवादी, तत्त्वज्ञ, लेखक, उद्योजक, समाजसेवक व शेतकरी म्हणून भवरलालजींनी ठसा उमटविला, या शब्दांत नेब्रास्का विद्यापीठाने मानपत्रात गौरव केला आहे. परिषदेला जगभरातील कृषी व जलव्यवस्थापनातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नेब्रास्कासारख्या जागतिक विद्यापीठाने भंवरलालजींच्या जीवनकार्याला अधोरेखित करून त्यांच्या संशोधन प्रकल्पाला नाव देणे, हा भारतीय कृषी क्षेत्राचा गौरव आहे. जैन इरिगेशन यापुढेही विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत काम करण्यासाठी पुढाकार घेऊन संशोधनाला चालना देईल.- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.
अमेरिकन विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पाला भंवरलाल जैन यांचे नाव
By admin | Published: April 28, 2016 6:03 AM