नवी दिल्ली - केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम, रेल्वे अडवली - आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.
पुण्यातील APMC मार्केट खुले, ट्रेडर्स म्हणाले - शेतकऱ्यांना समर्थन -आमच्या शेतरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे.
वेगवेगळ्या राज्यांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था -शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे.
याशिवाय देशातील अनेक राज्यांत वेगवेगळे राजकीय पक्ष या बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ओडिशातही भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी भुवनेश्वर येथे रेल्वे अडवल्या. तसेच भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही, मात्र, शेतकरी आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असे ममत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात -कामारेड्डी येथील रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एका बसचालकाने म्हटले आहे, "मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठविला. त्यांना पाठिंबा देत, आम्ही आरटीसीचे कामगार येथे आंदोलन करत आहोत. शेतकर्यांवर अन्याय होऊ नये."
या पक्षांचा भारतबंदला पाठिंबा -1.काँग्रेस2.माकपा3.डीएमके4.सीपीआई5.राजद6. एनसीपी7.जेएमएम8.सपा 9. शिवसेना10.अकाली दल11.भाकपा-माले12. गुपकार गठबंधन13.टीएमसी14.टीआरएस15.एआयएमआयएम16. आम आदमी पार्टी17. पीडब्ल्यूपी18. बीवीए19. आरएसपी20. एफबी21. एसयूसीआय (सी)22. स्वराज इंडिया23.जेडीएस24. बसपा