नवी दिल्ली: राजस्थानचे आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना भगवान राम (Lord Ram) यांच्याशी केली आहे होती. 'राहुल गांधी प्रभू रामापेक्षा जास्त पदयात्रा करत आहेत', असे ते म्हणाले होते. तर, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेले आहेत. नाना पटोले म्हणाले की, 'राहुल आणि राम या दोघांचे नाव 'रा' ने सुरू होणे हा योगायोग आहे. पण, काँग्रेस राहुल गांधींची तुलना भगवान रामाशी करत नाही. भाजपची लोक करतात. राहुल गांधी हे माणूस आहेत आणि ते मानवतेसाठी काम करत आहेत.'
नाना पटोले काय म्हणाले?नाना पटोले म्हणाले की, भगवान श्रीरामही (पदयात्रा) कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालले होते, शंकराचार्यही त्याच मार्गाने चालले होते. आता राहुल गांधीही पदयात्रेत त्याच मार्गावर आहेत. त्यांच्या पदयात्रेत लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रभू राम आणि राहुल गांधी या दोघांचे नाव "रा" ने सुरू होणे, ही योगायोगाची गोष्ट नाही. पण आम्ही राहुलची तुलना प्रभू रामाशी करत नाही, भाजपची लोक त्यांच्या नेत्यांची तुलना देवाशी करतात. ते देव आहेत आणि राहुल गांधी माणूस आहेत. ते मानवतेसाठी काम करत आहे,' असं पटोले म्हणाले.
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी केली रामाशी तुलनायापूर्वी राजस्थानचे मंत्री परसादी लाल मीणा यांनी राहुल गांधी हे प्रभू रामापेक्षा जास्त चालत असल्याचे म्हटले होते. श्रीराम अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत जेवढे पायी चालत गेले, त्यापेक्षा जास्त प्रवास राहुल गांधी करणार आहेत, असे मीणा म्हणाले होते. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, राहुल गांधी हे भगवान रामापेक्षा मोठे कसे असू शकतात? काँग्रेस नेत्यांनी नेहमीच देव निवडण्यात चूक केली आहे.