अकोला - भारत जोडो यात्रा ही देशाची यात्रा आहे ही आता काँग्रेस पक्षाची यात्रा झालेली नाही सर्वसामान्यांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब या त्यातून व्यक्त होत आहे अशी यात्रा थांबविल्यास त्याचे काय परिणाम होतील याची चिंता त्यांनी करावी, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे नाव न घेता दिला आहे
पातुर येथे गुरुवारी पहाटे भारत जोडे यात्रेला प्रारंभ झाला त्या पूर्वी ते माध्यमंशी बोलत होते पटो ले म्हणाले की भारत जोडो यात्रा ही देशाच्या प्रश्नावर भाष्य करणारी यात्रा आहे त्यामुळे तिला थांबवण्याचा प्रश्नच नाही दरम्यान राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा जयंती मध्ये सावरकरांच्या संदर्भामध्ये केलेले वक्तव्य हे तपासून घ्यावे बिरसा मुंडा यांनी प्रलोभन नाकारून आपल्या मातीशी इमान कायम ठेवल सावरकरांना इंग्रजांनी पेन्शन सुरू केली ती पेन्शन त्यांनी का स्वीकारली असा प्रश्न विचारणे गुन्हा नाही राहुल गांधी यांनी विचारलेला प्रश्न हा जनतेचा प्रश्न आहे, जनतेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि देशाचे नेते देत नसतील तर ते जनतेपेक्षा मोठे झाले का असा सवाल त्यांनी उपस्थित केला